दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीने चेन्नई सुपरकिंग्जचा तीन गडी आणि दोन चेंडू राखत पराभव केला. या विजयासह दिल्लीने १३ सामन्यात २० गुणांसह अग्रस्थान मिळवलं आहे. दरम्यान दिल्लीविरोधात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा विजय व्हावा यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत होते. प्रार्थना कऱणाऱ्यांमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लेक झिवादेखील होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IPL 2021: …अन् विजयी षटकार लगावल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजाने थेट चेन्नईच्या गोलंदाजाला मारली मिठी, पहा व्हिडीओ

स्टँडमध्ये बसलेल्या झिवाचा हात जोडून प्रार्थना करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नई जिंकावी यासाठीच झिवा प्रार्थना करत असावी असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. मात्र या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. पण झिवाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

झिवा प्रार्थना करत होती तेव्हा तिच्यासोबत साक्षी धोनीदेखील दिसत आहे. त्यावेळी दिल्लीची धावसंख्या १०९ धावांवरसहा गडी बाद होती. दिल्लीला विजयासाठी १३७ धावांची गरज होती.

अनेकांनी झिवाचा हा फोटो दिवसातील सर्वात सुंदर क्षण असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत असावी असं म्हटलं आहे

शेवटी दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. अटीतटीच्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीच्या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी करत चेन्नईला २० षटकात ५ बाद १३६ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने विजयी फटका लगावला.

दिल्लीचा विजय

चेन्नईच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शॉला गमावले. चेनन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला झेलबाद केले. शॉने १८ धावा केल्या. पहिला गडी बाद झाल्यानंतर शिखर धवनने कोणताही दबाव न घेता फटकेबाजी केली. चहरने टाकलेल्या पाचव्या षटकात धवनने २१ धावा चोपल्या. पुढच्याच षटकात दिल्लीने अर्धशतक पूर्ण केले, पण त्यांना श्रेयस अय्यरला गमवावे लागले. ६ षटकात दिल्लीने २ बाद ५१ धावा केल्या. नवव्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना ऋषभ पंत झेलबाद झाला.पंतने १५ धावा केल्या. त्यानंतर पदार्पणवीर फलंदाज रिपाल पटेलने (१८) थोडा प्रतिकार केला. पण १३व्या षटकात जडेजाने त्याला तंबूत पाठवले. रिपाल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन अश्विनला बढती मिळाली होती. पण शार्दुल ठाकूरने त्याचा त्रिफळा उडवला. याच षटकात शार्दुलने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धवनला बाद करत दिल्लीच्या अडचणी वाढवल्या. धवनने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. ९९ धावांत दिल्लीचे ६ फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि अक्षर पटेलने भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या १८व्या षटकात हेटमायरला जीवदान मिळाले. कृष्णप्पा गौतमने त्याचा सोपा झेल सोडला शिवाय चौकारही दिला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ६ धावांची गरज होती, .या षटकात ब्राव्होने अक्षरला बाद करत सामन्याची रंगत वाढवली. पण त्यानंतर आलेल्या कगिसो रबाडाने चौकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २८ धावा केल्या.