एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत मांडण्यात येणा-या वस्तूसंचापेक्षा थोडय़ा अधिक वस्तू इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मांडण्यात येतात. जलरंगात अगर क्रेऑन (पेस्टल कलर्स) मध्ये चित्र पुरे करावयाचे असते. यासाठी एलिमेंटरी परीक्षेस अडीच तास व इंटरमिजियट परीक्षेस तीन तास वेळ देण्यात येतो. बाजारात सहज मिळतील अशा नित्य वापरातल्या वस्तू असतात.
या विषयाचा सराव करताना प्रथम सुटय़ा स्वतंत्र वस्तू रेखाटा. भांडय़ाचे काठ वर्तुळाकार असतात. तसेच बहुधा बूडही वर्तुळाकार असते. पुस्तक अगर ठोकळा यांच्या कडेच्या समांतर रेषेतील अंतर त्याची बाजू दूर असते त्यात ते कमी झालेले जाणवते. या काही ठळक यथार्थ दर्शनातील (परस्पेक्टिव्ह) गोष्टी लक्षात ठेवा. प्रकाशाची दिशा लक्षात घेऊन छाया कशी पडली आहे तिचे निरीक्षण करा. एकंदर वस्तू समूहात सर्वात प्रकाशित भाग कोणता ते लक्षात ठेवा. रंग देताना तीव्र प्रकाशाच्या जागी रंग न देता सोडा अगर अगदी फिका रंग त्या जागी भरा. प्रत्येक वस्तूच्या जमिनीवर पाठीमागच्या कपडय़ावर पडणा-या सावलीचे नीट निरीक्षण करा. ते चित्रात दाखवा. वस्तुचित्र काढताना पुढील गोष्टींना महत्त्व असते.
१) वस्तुसंच कशारीतीने कागदावर काढणे सोयीचे आहे ते लक्षात घेऊन कागद उभा किंवा आडवा धरा.
२) वस्तुसंचाच्या दृष्टीने त्यातील महत्त्वाची वस्तू मधोमध आहे का आडव्या डाव्या अगर उजव्या बाजूस आहे याचा अंदाज घ्या. त्या मानाने इतर वस्तू साधारण कोठे येतात ते उभ्या अगर आडव्या रेषा काढून त्यांच्या साहाय्याने ठरवा.
३) वस्तूचे परस्परांशी प्रमाण यथायोग्य आहे ना ते पाहा.
४) कापडावरील सर्व चुण्या दाखविण्यापेक्षा महत्त्वाच्या तेवढय़ाच चुण्या दाखवा.
५) रंगभरण करताना रंगछटा हळूहळू गडद करा.
६) एका रंगात दुसरा रंग मिसळून छटा गडद करता येते. उदाहरणार्थ पिवळा + पिवळा, नारिंगी+ नारिंगी, तांबडा+ तांबडा, जांभळा किंवा तपकिरी/ तपकिरी/ काळा व गर्द निळा या क्रमाने छटा गडद होऊ शकतात.
सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या, चित्रलीला निकेतन, पुणे
क्रमश:
आधीचे लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेविषयी (भाग एक)
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
स्थिर चित्र कसे काढावे? (भाग तीन)
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत मांडण्यात येणा-या वस्तूसंचापेक्षा थोडय़ा अधिक वस्तू इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मांडण्यात येतात.

First published on: 12-09-2013 at 06:05 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About drawing grade examination part three