‘नीटी’ म्हणजेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरल फेलोशिपच्या २०१७ या सत्रात प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत-

उपलब्ध विषयांचा तपशील- या डॉक्टरल फेलोशिपसाठी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम्स, ऑपरेशन्स अ‍ॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, मार्केटिंग वित्तीय सेवा, अर्थशास्त्र, नीती-व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

’  आवश्यक शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान, लाइफ सायन्सेस, विज्ञान यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ६०% गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत आणि त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

’  निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा, संशोधन विषयावरील सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्याची डॉक्टरल फेलोशिपसाठी अंतिम निवड करण्यात येईल.

’  आर्थिक साहाय्य- निवड झालेले उमेदवार  जीएटीई, एनईटी, जेआरएफ यांसारखे पात्रताधारक असल्यास त्यांना केंद्र सरकारच्या योजनेनुसार त्यांच्या डॉक्टरल संशोधन कालावधीसाठी विशेष आर्थिक साहाय्य करण्यात येईल.

’  अर्जासह भरावयाचे शुल्क– उमेदवारांनी अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून ते सर्वसाधारण गटातील असल्यास १०० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी ५०० रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

’  अधिक माहिती व तपशील- वरील फेलोशिपच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मुंबईच्या दूरध्वनी क्र. ०२२- २८०३५६५१ अथवा ०२२- २८५७३३७१ वर संपर्क साधावा अथवा ‘नीटी’च्या ६६६.ल्ल्र३्री.ी४ि या संकेतस्थळाला भेट द्यावी.

’  विशेष सूचना- अर्जदारांनी आपल्या अर्जासह त्यांच्या संबंधित विषयावर आधारित प्रस्तावित संशोधन प्रकल्प विषयावर आधारित १५०० शब्दांपर्यंतचा आलेख पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०१७ आहे.

 दत्तात्रय आंबुलकर

Story img Loader