१) शांतिनिकेतन संदर्भात गुरुदेव टागोर ….. मुळे अधिक प्रभावित झालेले दिसतात.
ए) निसर्गवाद आणि कार्यवाद बी) आदर्शवाद आणि निसर्गवाद, सी) कार्यवाद आणि आदर्शवाद, डी) अस्तित्ववाद आणि कार्यवाद
२) शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अनुसार विद्यार्थी-शिक्षक प्रमाण …… आहे.
ए) ३५:१, बी) २५:१ सी) ३०:१ डी) २०:१
३) स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने… योजना सुरू केली.
ए) पंडिता रमाबाई शिक्षण योजना, बी) जिजामाता मोफत शिक्षण योजना, सी) इंदिरा गांधी मोफत व्यवसाय शिक्षण योजना, डी) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
४) लहान मूल चालू लागण्यापूर्वी बसायला लागते व धावण्यापूर्वी चालायला लागते, यावरून विकास प्रक्रिया…..
ए) विशिष्ट क्रमाने होते बी) स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होते सी) प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते डी) सातत्याने होते
५) द्विभाषिक शाळा म्हणजे..
ए) इंग्रजी विषय उच्च व निम्न स्तरावर शिकविला जातो, ती शाळा. बी) कमीत कमी दोन भाषा विषय शिकविले जातात, ती शाळा. सी) गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकविले जातात, ती शाळा. डी) दोन भाषांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते, ती शाळा.
६) शिक्षणावर होणारा खर्च हा ..
ए) भविष्यकालीन गुंतवणूक असते.
बी) कर्जरूपाने उपलब्ध केला जातो.
सी) सांपत्तिक स्थितीच्या प्रमाणात नसतो. डी) उत्पादनक्षम खर्च असतो.
७) कर्णबधिर सचिनने अतिशय प्रयत्न करून चित्रकलेचे बक्षीस मिळविले, हे… या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे.
ए) तादात्म्य, बी) प्रतिपूरण, सी) कृतकसमर्थन, डी) उदात्तीकरण
८) श्लोक त्याचा गृहपाठ कधीच वेळेत पूर्ण करत नाही, मार्गदर्शनासाठीची त्याची गरज ही….. आहे.
ए) व्यावसायिक बी) वैयक्तिक सी) शैक्षणिक डी) सामाजिक
९) भारतात ६ ते १० या वयोगटासाठी सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा पहिला आराखडा…. यांनी मांडला.
ए) गोपाळकृष्ण गोखले, बी) गोपाळ गणेश आगरकर, सी) महात्मा गांधी, डी) मेकॉले
१०) शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना स्किनर ….. यावर भर देतो.
ए) शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या तत्त्वांचे उपयोजन बी) मानवीवर्तन सी) अध्ययन-अध्यापन प्रक्रिया डी)व्यक्तिविकास
११) सृष्टी ही तिसऱ्या इयत्तेमध्ये शिकते, े/६, ु/,ि 6/9 यामधील फरक ओळखू शकत नाही, तर ती ….. असावी.
ए) मतिमंद बी) गतिमंद सी) स्वमग्न डी) अध्ययन अकार्यक्षम
१२) शिक्षकनिर्मित चाचणी (अप्रमाणित) प्रथमत: … असली पाहिजे.
ए) विश्वसनीय बी) समप्रमाण सी) वस्तुनिष्ठ डी) पर्याप्त
१३) सृजनशीलता ही क्वचितच …. प्रकारच्या प्रश्नांद्वारे तपासली जाते.
ए) पत्रलेखन बी) निबंधवजा सी) बहुपर्यायी डी) लघुत्तरी
१४) बालवाडीमध्ये मूल शिक्षकाने शिकविलेली भाषेतील अक्षरे शिकते. ही अध्यापनाची.. पातळी होय.
ए) स्मृती बी) आकलन सी) विमर्शी चिंतन डी) अभिसंधान
१५) शिक्षक आशय स्पष्ट करण्यासाठी माध्यमाची निवड अध्यापनाच्या …. अवस्थेमध्ये करतात.
ए) उत्तरावस्था बी) पूर्वावस्था सी) मध्यावस्था डी) आंतरक्रियात्मक
१६) अध्ययन अक्षम विद्यार्थी म्हणजे ….. होय.
ए) अध्ययन संधीपासून वंचित असणारा बी) मतिमंदत्व, संवेदनात्मक दोष आणि भावनिक असंतुलन असणारा सी) क्षमता आणि संपादन यामध्ये भेद असणारा डी) अध्ययनामध्ये अल्प किंवा तात्कालिक अडचण असणारा
१७) कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचे …. हे एक लक्षण आहे.
ए) हे विद्यार्थी एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतात.
बी) हे विद्यार्थी चांगले खेळाडू असतात.
सी) हे विद्यार्थी चंचल असतात.
डी) हे विद्यार्थी अधिक जिज्ञासू असतात.
१८) सूक्ष्माध्यापनाद्वारे प्रशिक्षण हे …. वर आधारित असते.
ए) कौशल्य उपागम बी) क्षमता उपागम सी) आकलन उपागम डी) ज्ञान संपादन उपागम
१९) शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता … या गोष्टींमधून निश्चित होते.
ए) शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, खासगी संस्था. बी) वेळ, पैसा, स्थल, उपयुक्तता.
सी) गुणवत्ता, मूल्ये, ज्ञानसमृद्धी, डी) उद्दिष्टे, मूल्यमापन, कार्यवाही, निकाल.
२०) भूतकालीन घटनांचे वर्णन व पृथक्करण … पद्धतीत होते.
ए) प्रायोगिक बी) सर्वेक्षण सी) ऐतिहासिक डी) यापेक्षा वेगळे उत्तर
२१) प्रयोग म्हणजे विशिष्ट परिस्थिती स्थिर ठेवून केलेले …. होय.
ए) लोकेशन बी) मीमांसा सी) न्यायदर्शन डी) निरीक्षण
२२) काव्य, कथा, चित्र या ….. कल्पना आहेत.
ए) सौंदर्यनिष्ठ बी) स्वैर सी) व्यावहारिक डी) वरील सर्व
२३) दलितांच्या उद्धारासाठी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश कोणी दिला?
ए) डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी) पं. जवाहरलाल नेहरू सी) महात्मा फुले डी) महात्मा गांधी
२४) जात, लिंग, वर्ण, दर्जा यांच्या बंधनातून मुक्त होणे आणि क्षमतांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय, हे मत कोणी मांडले?
ए) व्ॉटसन बी) वुडवर्थ सी) जॉन डय़ुई डी) मॅकडूगल
२५) समाजातील कमकुवत वर्ग, विशेषत: अनुसूचित जाती व जमातींच्या हिताचे संरक्षण करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे?
ए) कलम ४८ बी) कलम ४६ सी) कलम ४४ डी) कलम ४२
उत्तरे : १) बी, २) सी, ३) डी, ४) ए, ५) डी, ६) ए, ७) बी, ८) सी, ९) ए, १०) सी, ११) डी, १२) बी, १३) सी, १४) ए, १५) बी, १६) सी, १७) डी, १८) ए, १९) सी, २०) सी, २१) डी, २२) ए, २३) ए, २४) सी, २५) बी
बालमानसशास्त्र व शिक्षणशास्त्र सराव प्रश्न
१) शांतिनिकेतन संदर्भात गुरुदेव टागोर ..... मुळे अधिक प्रभावित झालेले दिसतात. ए) निसर्गवाद आणि कार्यवाद बी) आदर्शवाद आणि निसर्गवाद, सी) कार्यवाद आणि आदर्शवाद, डी)
आणखी वाचा
First published on: 28-11-2014 at 05:29 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0 %e0%a4%b5 %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%b6