पश्चिम केण्टुकी विद्यपीठात संगणक विज्ञान कार्यक्रम अभ्यासक्रम शिकत असलेल्या ६० पैकी २५ भारतीय विद्यार्थ्यांना या सत्रानंतर हा अभ्यासक्रम सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी लागणारी श्रेणी या विद्यार्थ्यांकडे नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या आदेशामुळे विद्यार्थ्यांना भारतात परतणे भाग पडेल अथवा त्यांना अमेरिकेतील अन्य विद्यापीठ किंवा दुसरा अभ्यासक्रम शोधावा लागणार आहे. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भरतीचे काम दिले होते, त्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी जाहिराती दिल्या होत्या. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान कार्यक्रमाचे अध्यक्ष जेम्स गॅरी यांनी सांगितले की, जवळपास ४० विद्यार्थी प्रवेशासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना विद्यापीठाने मदत देण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. एकूण ६० विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी किमान २५ जणांना अभ्यासक्रम सोडावा लागणार आहे, असे जेम्स गॅरी यांनी म्हटल्याचे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास अनुमती देणे हा पैशांचा अपव्यय आहे, कारण त्यांना अभ्यासक्रमातील अनिवार्य भाग असलेला संगणक कार्यक्रम लिहिता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा