राज्यसेवा परीक्षेत वर्ग एकचे पद मिळेल ही अपेक्षा होती, मात्र राज्यात पहिला येईन ही अपेक्षा बाळगली नव्हती, अशी प्रतिक्रिया एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आलेल्या अमित शेडगे यांनी दिली आहे. लहानपणापासून वडिलांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा हे पुढचे ध्येय असल्याचे शेडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच शासकीय सेवेत काम करण्याची माजी इच्छा होती. कृषी पदविका प्राप्त केल्यापासून मी तयारी सुरू केली होती. २००७ मध्ये झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत माझी पहिल्यांदा निवड झाली होती, मात्र या वेळी मला अपेक्षित यश न मिळाल्याने नायब तहसीलदार पद मिळाले होते. नायब तहसीलदार म्हणून रत्नागिरीतील लांजा, दापोली आणि त्यानंतर आता रायगड जिल्ह्य़ातील तळा येथे काम करण्याची संधी मिळाली. या पदावर काम करताना उपजिल्हाधिकारी पदाचे अधिकार आणि महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी जिद्द सोडली नाही. नायब तहसीलदार पदावर रुजू झाल्यावरही मी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरूच ठेवली. त्याचे फळ आज मिळाले. खूप आनंद झाला आहे.
माझे वडील माझे मार्गदर्शक होते. महावितरणमध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या वडिलांनी मला लहानपणापासून हे स्वप्न दाखवले होते. ते आज पूर्ण झाल्याचे शेडगे यांनी सांगितले.
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेनंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रमसाफल्य..
सतीश शितोळे (गुणवत्ता यादीत ३ रा)
मूळचा दौंडच्या शेतकरी कुटुंबातील असलेला सतीश आयुर्वेदिक डॉक्टर आहे. प्रशासकीय सेवा परीक्षांच्या अभ्यासासाठी तो पुण्यात राहात होता. राज्य सेवा परीक्षेचा हा त्याचा पाचवा प्रयत्न होता. पुण्यात चाणक्य मंडल, युनिक अ‍ॅकॅडमी आणि स्टडी सर्कल येथून त्याने मार्गदर्शन घेतले. राज्य सेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवण्याबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याचा ५१४ वा गुणानुक्रम आला आहे. आपल्या या यशाचे श्रेय तो आपल्या शेतकरी वडिलांना आणि भावाला देतो. त्याला केंद्रीय लोकसेवेतच जाण्याची इच्छा असून त्याच्या गुणानुक्रमानुसार त्याला महसूल सेवा मिळेल.
शिवाजी जगताप (गुणवत्ता यादीत ५ वा)
शिवाजी मूळचा बारामतीचा असून आयुर्वेदिक डॉक्टर आहे. हा त्याचा राज्य सेवा परीक्षेचा चौथा प्रयत्न होता. याआधी त्याने पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी आणि नायब तहसीलदार या पदांसाठीच्या परीक्षांमध्येही चांगल्या गुणानुक्रमाने यश मिळवले आहे.
 सचिन गाजरे (गुणवत्ता यादीत ९ वा)
सचिनचे मूळ गाव सांगली असले तरी तो जन्मापासून पुण्यातच राहतो. त्याने एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्य सेवा परीक्षेचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. परीक्षेचा अभ्यास करताना त्याने स्वाध्यायावरच भर दिला. तो युनिक अ‍ॅकॅडमीत शिकवतही होता. राज्याच्या गुणवत्ता यादीत सचिनचा ९ वा तर खुल्या प्रवर्गात त्याचा ८ वा गुणानुक्रम आला आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

मुलींचे प्रमाण घटले
राज्यसेवा परीक्षेमध्ये मुलींच्या प्रमाणात घट झाली असून ३५९ पदांपैकी फक्त ११० पदांसाठी मुली पात्र ठरल्या आहेत. यावर्षी मुलाखतीसाठी कमी मुली पात्र ठरल्या होत्या. त्याचाच परिणाम या निकालावर दिसून येत असल्याचे मत उमेदवार आणि प्रशिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.