राज्यसेवा परीक्षेत वर्ग एकचे पद मिळेल ही अपेक्षा होती, मात्र राज्यात पहिला येईन ही अपेक्षा बाळगली नव्हती, अशी प्रतिक्रिया एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आलेल्या अमित शेडगे यांनी दिली आहे. लहानपणापासून वडिलांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा हे पुढचे ध्येय असल्याचे शेडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच शासकीय सेवेत काम करण्याची माजी इच्छा होती. कृषी पदविका प्राप्त केल्यापासून मी तयारी सुरू केली होती. २००७ मध्ये झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत माझी पहिल्यांदा निवड झाली होती, मात्र या वेळी मला अपेक्षित यश न मिळाल्याने नायब तहसीलदार पद मिळाले होते. नायब तहसीलदार म्हणून रत्नागिरीतील लांजा, दापोली आणि त्यानंतर आता रायगड जिल्ह्य़ातील तळा येथे काम करण्याची संधी मिळाली. या पदावर काम करताना उपजिल्हाधिकारी पदाचे अधिकार आणि महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी जिद्द सोडली नाही. नायब तहसीलदार पदावर रुजू झाल्यावरही मी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरूच ठेवली. त्याचे फळ आज मिळाले. खूप आनंद झाला आहे.
माझे वडील माझे मार्गदर्शक होते. महावितरणमध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या वडिलांनी मला लहानपणापासून हे स्वप्न दाखवले होते. ते आज पूर्ण झाल्याचे शेडगे यांनी सांगितले.
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेनंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वप्नपूर्तीचा आनंद; आता लक्ष्य ‘आयएएस’- अमित शेडगे
राज्यसेवा परीक्षेत वर्ग एकचे पद मिळेल ही अपेक्षा होती, मात्र राज्यात पहिला येईन ही अपेक्षा बाळगली नव्हती, अशी प्रतिक्रिया एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आलेल्या अमित शेडगे यांनी दिली आहे. लहानपणापासून वडिलांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा हे पुढचे ध्येय असल्याचे शेडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-05-2013 at 02:34 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dream fulfilled to enjoy now target s ias amit shedge