इंडोनेशियमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या चमूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले आहे.
भारतातर्फे देबादित्य प्रामाणिक (कोलकाता), आनंद अय्यर (भोपाळ), अमेय पटवर्धन (मुंबई) यांनी सुवर्ण, तर ध्रुव सिंह (मुंबई) आणि अनुप गवाणकर (मुंबई) यांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे. नेतृत्व ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’चे डॉ. अनिकेत सुळे आणि एसआयईएस महाविद्यालयाचे स्वप्निल जावकर यांनी केले. ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’चे प्रा. मयांक वाहिया, ‘मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठा’चे प्रा. नजम हसन आणि ‘एनआयएसईआर’चे अशोक मोहापात्रा यांनी निरीक्षक म्हणून सहकार्य केले.
या ऑलिम्पियाडमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, चीन, कोरिया, ब्राझील, ग्रीस, पोलंड, रुमानिया, रशिया, थायलंड इत्यादी ४१ देशांच्या एकूण ४६ संघांच्या तब्बल २१० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. १० विद्यार्थ्यांना सुवर्ण, २५ जणांना रौप्य आणि ३६ जणांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले. १० व्या खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे यजमान म्हणून भारताने या वेळी जबाबदारी स्वीकारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा