वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, क्रीमी लेयर, अधिवास इत्यादी आवश्यक दाखले सादर करण्यास मुदतवाढ दिली जाईल, ही प्रमाणपत्रे हातात नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
व्यावसायिक अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतानाच जातीचे, जात पडताळणीचे, क्रीमी लेयर आणि अधिवासाचे दाखले सादर करण्याचा निर्णय उच्च-तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे; परंतु हे दाखले विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, भटके-विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. या संदर्भात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या ही बाब काही विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात आणून दिली.
‘जातीच्या दाखल्यामुळे मागास विद्यार्थ्यांचे प्रवेश अडणार नाहीत’
वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, क्रीमी लेयर, अधिवास इत्यादी
First published on: 23-06-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backward students admission will not stuck due to caste certificate