मुंबई विद्यापीठासह कोकणातील अनेक महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचे विविध प्रश्न गेले अनेक वष्रे प्रलंबित आहेत. यासंदर्भात सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. याचा निषेध म्हणून २ सप्टेंबर रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार असून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्ष संघ (बुक्टू) या संघटनेने घेतला आहे. मुंबई विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही. तर खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही विद्यापीठ व सरकार प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस पाऊले उचलत नाहीत. तसेच इतर प्रश्नांवर म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याची खंत प्राध्यापकांनी व्यक्त केली. त्यानंतर स्वाक्षऱ्यांसह सर्व अहवाल राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याचेही डॉ. मधू परांजपे यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा