नृत्यक्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विद्यापीठे आणि अभ्यास केंद्रांतर्फे
विशेष अभ्यासक्रम सुरू आहेत. अशा काही अभ्यासक्रमांची ओळख.
काही पालक आणि विद्यार्थी पांरपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळया करिअरचा विचार करतात. खरेतर आजच्या व्यावसायिक जगात कोणताही विषय घेऊन उत्तम करिअर घडविण्याची संधी मिळू शकते. नृत्यक्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम दर्जाचे शिक्षण-प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक ठरते. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कथ्थक : आपल्या देशात कथ्थक नृत्याचे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी महत्त्वाची संस्था म्हणजे दिल्ली येथील कथ्थक केंद्र. या संस्थेला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक या नावानेसुद्धा ओळखले जाते. ही संस्था केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीअंतर्गत १९६४ सालापासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत कथ्थक नृत्यप्रकारातील विविध कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत,
फाऊंडेश न अभ्यासक्रम : कालावधी- पाच वर्षे वयोमर्यादा ९ ते १४ वर्षे. या अभ्यासक्रमाला प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे शुल्क दरमहा २०० रुपये आहे.
पदविका (उत्तीर्ण) अभ्यासक्रम: कालावधी- तीन वर्षे/ वयोमर्यादा १४ ते १९ वर्षे. ६० टक्के गुणांसह फाऊंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो किंवा या केंद्राच्या बाहेरील ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांची कथ्थक नृत्यातले कौशल्य बघणारी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. ते सादरीकरण बघून संबंधित उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवला जातो. उमेदवारांना केवळ गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे शुल्क दरमहा २५० रुपये आहे.
पदविका (ऑनर्स) अभ्यासक्रम : कालावधी तीन वर्षे. वयोमर्यादा १७ ते २२. अर्हता- दहावी परीक्षेत ६० टक्के गुण प्राप्त केलेल्या आणि कथ्थक नृत्याचे पुरेसे प्रात्यक्षिक ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. मात्र त्यासाठी त्याला प्रात्यक्षिक प्रवेश परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते. या संस्थेचा पदविका (उत्तीर्ण) अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांचीही प्रवेशपरीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. गुणवत्तेनुसार २० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना तबला/ पखवाज वादन/ योग प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी कथ्थकचे नृत्य करण्यासाठी सक्षम समजला जातो. तसेच  नृत्यशिक्षक म्हणूनही करिअर करू शकतो. या अभ्यासक्रमाचे  शुल्क दरमहा ३०० रुपये आहे.
पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रम : या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. वयोमर्यादा २० ते २६ वर्षे. ६५ टक्के गुणांसह संस्थेचा डिप्लोमा (ऑनर्स कोर्स) केलेले विद्यार्थी आणि कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मात्र त्यासाठी त्यांना प्रात्यक्षिक प्रवेशपरीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते. एकूण २० विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे  शुल्क दरमहा ३५० रुपये आहे.
अर्ज प्रक्रिया : अर्ज व माहितीत्रकासाठी १५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, डायरेक्टर कथ्थक केंद्र, दिल्ली यांच्या नावे काढून पाठवावा लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
शिष्यवृत्ती आणि वसतिगृह : या संस्थेच्या डिप्लोमा (ऑनर्स) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी दरमहा दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. पोस्ट डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. २०११-२०१२ सालापासून या संस्थेने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दरमहा प्रत्येकी एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. हरिजन सेवक संघाने शिफारस केलेल्या या सवंर्गातील उमेदवारांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. दिल्लीच्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी दरमहा २५० रुपये शुल्क घेतले जाते. पत्ता- कथ्थक केन्द्र, भवालपूर हाऊस, भगवानदास रोड, नवी दिल्ली-११०००१. दूरध्वनी-०११-२७६५४२३२, २७६५४२३४, वेबसाइट- http://www.sangeetnatak.org, ईमेल- delhi_kathak@yahoo.co.in
युनिव्हर्सटिी ऑफ हैदराबाद :
या विद्यापीठातर्फे मास्टर्स प्रोग्रॅम इन परफॉर्मिंग आर्टस् इन डान्स हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमातंर्गत कुचिपुडी आणि भरतनाटय़म् या दोन नृत्यप्रकारांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. प्रवेश घेताना स्पेशलायझेशनचे क्षेत्र निश्चित करावे लागते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. दोन्ही स्पेशलायझेशनसाठी एकच परीक्षा असून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर संबंधित नृत्य प्रकारातील प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. प्रवेशपरीक्षा वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीची असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचा संबंधित विषयातील कल तपासला जातो. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर, मात्र त्याने संबंधित विषयाचे ज्ञान मिळवलेले असावे किंवा त्यास संबंधित नृत्य प्रकारचा अनुभव असावा.
याच विद्यापीठाने मास्टर्स प्रोग्रम इन परफॉर्मिंग आर्ट्स इन थिएटर आर्ट हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला  आहे. या अभ्यासक्रमालासुद्धा प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पेपर वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. अर्हताको णत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण केल्यास विद्यार्थ्यांची निवड (१) अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स इन डिझाइन अ‍ॅण्ड डायरेक्शन (२) अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स इन थिएटर स्टडीज (३) अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स इन अ‍ॅक्टिंग अ‍ॅण्ड चिल्ड्रन थिएटर यांपकी कोणत्याही एका अभ्यासक्रमासाठी होऊ शकते. त्याचा निर्णय संबंधित विभाग घेतो. प्रवेशपरीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये राज्यातील मुंबई, नागपूर पुणे या केद्रांचाही समावेश आहे.
अर्ज व माहिती पत्रकासाठी ३५० रुपयांचा डिमांड डठाफ्ट फायनान्स ऑफिसर, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद या नावाने काढून पाठवा. सोबत २५ रुपयांची पोस्टाची तिकिटे लावलेला व स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा पाठवा. डीडी आंध्रा बँक, नामपल्ली ब्रँच हैद्राबाद (कोड क्रमांक- ३७८) या नावे असावा. अर्ज http://www.uohyd.earnet.in या वेबसाइटवरसुद्धा ठेवण्यात आला आहे. पत्ता : डेप्युटी रजिस्ट्रार (अ‍ॅकेडमिक्स अ‍ॅण्ड एक्झामिनेशन) युनिव्हर्सटिी ऑफ हैद्राबाद, प्रोफेसर सी. आर. रोड, पोस्ट ऑफिस- सेंट्रल युनिव्हर्सटिी, हैदराबाद ५०००४६. दूरध्वनी-०४०२३१३२१०३
वेबसाइट- acad.hyd.ac.in/ notifications.html
ईमेल- acadinfo@uohyd.ernnet.in,
भातखंडे संगीत संस्था :
लखनौ स्थित भातखंडे संगीत संस्थेत नृत्यविषयक अभ्यासक्रमांमध्ये मणिपुरी, भरतनाटय़म, लोकनृत्य आदी नृत्यप्रकारांमध्ये पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतील.
पत्ता : भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट युनिव्हर्सटिी, कैसरबाग लखनौ (उत्तरप्रदेश.) वेबसाइट- http://www.bhatkhandemusic.edu.in  ईमेल- info@www.bhatkhandemusic.edu.in