फॅशन डिझायिनगमध्ये सर्जनशीलतेला मोठा वाव आहे. देशातील देशातील फॅशन जगताची उलाढाल केवळ २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून या क्षेत्रातील संधी विस्तारत आहेत. यासंबंधीच्या अभ्यासक्रमात मार्केटिंग, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यांचा समावेश असल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांना तंत्र, कला आणि व्यवसाय याचे तिहेरी प्रशिक्षण मिळते.
फॅशन डिझायिनग ही कला आहे. मात्र या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्जनशीलतेसोबतच यासंबंधीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं तितकंच गरजेचं असतं. यासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी नावाजलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी चाचणी परीक्षा पार कराव्या लागतात.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी :
फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील डिझाइन, मॅनेजमेंट आणि तंत्रज्ञानसंबंधीचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी दर्जेदार संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. २६ वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयानं केली. या संस्थेला स्वत: पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता, पाटणा, भोपाळ, रायबरेली, शिलाँग येथे शिकवले जातात.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद कानपूर, कांग्रा, कोलकोता, पाटणा, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे ३३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन :
हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, रायबरेली येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे १२० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन एॅक्सेसरी डिझाइन :
हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, गांधीनगर, हैद्राबाद कांग्रा, कोलकाता, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे २४० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे ३३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे २१० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हेद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३० उमेदवार याप्रमाणे १५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अॅपेरल प्रॉडक्शन :
हा अभ्यासक्रम मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता आणि जोधपूर येथे शिकवला जातो. प्रत्येकी ३२ उमेदवार याप्रमाणे ३३२ उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा