तेल आणि ऊर्जा क्षेत्राची वाढ भविष्यातही झपाटय़ाने होणार असून या क्षेत्रात उत्तम करिअरच्या
संधी आहेत. या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची ओळख –
भारताच्या सकल घरेलू उत्पादनात (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) पेट्रोलियम उद्योगाचा वाटा १६ टक्के आहे. पेट्रोलियम उत्पादने वापरण्यात भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर सातवा लागतो. या उद्योगाची वाढ भविष्यातही झपाटय़ाने होणार असून या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत. या संधींचा लाभ घेता यावा, यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान प्राप्त करणं संयुक्तिक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीजने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविणारी दक्षिण आशियातील ही एकमेव संस्था होय. या विषयातील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीजने सुरू केले आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालविणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था होय.
या विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. आतापावेतो उत्तीर्ण झालेल्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. या संस्थेला लंडनच्या एनर्जी इन्स्टिटय़ूटची अधिस्वीकृती मिळाली आहे. संस्थेने आतापावेतो ३००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहेत.
तांत्रिक अभ्यासक्रम : युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँण्ड एनर्जी स्टडीजच्या कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
यूपीईएस इंजिनीअिरग अॅप्टिटय़ूड टेस्ट : युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीजच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यूपीईएस इंजिनीअिरग अॅप्टिटय़ूड टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाडय़ात घेतली जाते. यंदा ही परीक्षा २५ मे रोजी होईल. पत्ता- यूपीईएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस -बिधोली व्हाया, प्रेमनगर देहरादून-२४८००७, दूरध्वनी- ०१३५-२१०२५४९, फॅक्स २७७६०९०, ई मेल- enrollments@upes.ac.in, वेबसाइट – http://www.upes.in
टेक्नो-लीगल अभ्यासक्रम : युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीज या संस्थेच्या वतीने टेक्नो-लीगल अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत-
एरोनॉटिकल इंजिनीअिरग/ एरोस्पेस : हिंदुस्थान युनिव्हर्सटिीच्या अंतर्गत हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या स्कूल ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-