बीडमधील आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कैफियत ऐकल्यानंतर या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांनी खासदार संजय निरूपम, फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांच्यासह मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चार विद्यार्थिनींनी त्यांना महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या छळवणुकीचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. सुमारे दहा मिनिटे शांतपणे विद्यार्थिनींची कैफियत एकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. आदित्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी यावेळी खासदार संजय निरूपम यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in