बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोन्ही स्तराच्या परीक्षांसाठी बंधनकारक आहे. या विषयाचे ३० प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहेत. समाजसुधारकांचे प्रयत्न, शिक्षण प्रसारकांचे कार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे, विशेष शैक्षणिक समित्या, शिक्षणातील नवीन प्रवाह, सर्व kg01शासकीय योजना, अध्यापनाच्या विविध पद्धती व सूत्रे, मूल्यमापन साधने व तंत्र, शैक्षणिक व्यवस्थापक यांचा अभ्यास या विषयासाठी महत्त्वाचा आहे. या विषयातील महत्त्वाचे मुद्दे पाहू.
व्याख्या, संकल्पना आणि सिद्धांत
*लोकांना कसे शिकवावे या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव याचा केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ होय – मॅकफरलँड
*मानसशास्त्राच्या सिद्धांतांचे शैक्षणिक कार्यात उपयोजन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या मानवी वर्तनाचे विश्लेषण करणे, अभ्यास करणे व निष्कर्ष काढणे हे कार्य शैक्षणिक मानसशास्त्र करते.
*व्यक्तीचे अनुभव आणि सहेतुक सराव यामुळे वर्तनात होणारे सुधारणात्मक व सापेक्षत: काय स्वरूपाचे मापनीय बदल म्हणजे ‘अध्ययन’.
*शिक्षक व विद्यार्थी यांच्यात चाललेली सामाजिक प्रक्रिया म्हणजे ‘अध्यापन’.
*अध्ययनासाठी करावा लागलेला प्रयत्न, लागलेला वेळ, प्रत्येक प्रयत्नातील बरोबर उत्तरांची किंवा चुकांची संख्या, या आकडेवारीच्या सरासरीच्या आधारे अध्ययनातील प्रगती दाखवणारा आलेख म्हणजे ‘अध्ययन वक्र’.
*विद्यार्थ्यांला आवाक्यातील उद्दिष्ट, पुरेसा वेळ व विषयाचा योग्यक्रम दिल्यास विद्यार्थी नेमून दिलेल्या विषयावर प्रभुत्व संपादन करतो- डॉ. ब्लूम (प्रभुत्वसंपादन उपपत्ती.)
*मानवी अध्ययन दुसऱ्याच्या वर्तनाचे अनुकरण करून घडत असते. विद्यार्थी समाजमान्य वर्तनाचे, आदर्शाचे निरीक्षण करून त्या वर्तनाचे अनुकरण करत अध्ययन करत असतो. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तनबदल घडवायचा असेल, तर विद्यार्थ्यांसमोर त्या वर्तनाचा आदर्श असला पाहिजे- अल्बर्ट बांदुरा.
*बालकांमध्ये आजी-आजोबा, आई-वडील, घरातील इतर व्यक्ती यांच्याकडून संक्रमित होणारे गुणधर्म म्हणजे ‘अनुवंश’.
*संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, कल्पना, स्मरण-विस्मरण, विचारप्रक्रिया, प्रेरणा, अवधान, अभिरुची अशा विविध मानसिक प्रक्रियेतून अध्ययन होते.
*बुद्धी ही अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी मानसशास्त्रात एकवाक्यता किंवा सर्वसमावेशक अशी व्याख्या नाही.
*बुद्धय़ांकावरून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता समजते. त्या बौद्धिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करून त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करता येते.
*एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, संपादन केलेले कौशल्य, तंत्रवृत्ती, सवयी यांचा दुसऱ्या परिस्थितीत होणारा उपयोग म्हणजे ‘अध्ययन संक्रमण’.
*किशोरावस्थेला ‘उत्तर बाल्यावस्था’ म्हणतात. या कालावधीत बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात याच कालावधीत होते. बालक शाळेत जात असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त इतरांसोबतही त्याचा संपर्क येत असतो.
*शिक्षणाचे औपचारिक, अनौपचारिक आणि सहजशिक्षण हे प्रमुख प्रकार आहेत.
*शाळेत जाऊन अध्ययन करणे, औपचारिक शिक्षण, शिकणाऱ्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शिक्षण- अनौपचारिक शिक्षण, वर्तमानपत्रे, आकाशवाणी किंवा तत्सम माध्यमांतून मिळणारे शिक्षण – सहजशिक्षण.
*मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन परीक्षा आहे.
*शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन महत्त्वाचे पैलू ज्ञान, सद्वृत्ती, सत्कृती आहे.
*शिक्षण वरच्या वर्गातून झिरपत झिरपत खालच्या वर्गात जावे, हा सिद्धान्त लॉर्ड मेकॉले यांनी मांडला.

शिक्षणक्षेत्रातील संस्था आणि व्यक्ती
*गायी-म्हशी वा शेळ्या-मेंढय़ांना चरण्यास घेऊन जाणाऱ्या मुलांसाठी कुरणशाळा आहेत. कुरणशाळेचा प्रयोग प्रथम कोसबाड, जि. ठाणे येथे केला गेला. त्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पारितोषिक देऊन कोसबाड येथील अनुताई वाघ या समाजसेविकेचा गौरव केला होता.
*नूतन बालक शिक्षण पद्धती गिजूभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी सुरू केली.
*वर्धा शिक्षण योजनेचे प्रवर्तक महात्मा गांधी आहेत. जीवन-शिक्षणपद्धती गांधीजींनी सुरू केली.
*आंतरराष्ट्रीय पातळीवर बालकांचे आरोग्य व शिक्षण यासाठी युनिसेफ संस्था कार्य करते.
*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आखणी व अंमलबजावणीसाठी केंद्र शासनास मदत करणारी संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (ठउएफळ)
*राज्य आंग्लभाषा शिक्षणसंस्था (रकएट) औरंगाबाद येथे आहे.
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद शिक्षकांसाठी ‘जीवन-शिक्षण’ मासिक प्रकाशित करते. बालभारती लहान मुलांसाठी ‘किशोर’ मासिक प्रकाशित करते.
*१ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठय़पुस्तके व शिक्षक हस्तपुस्तिका यांची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे करते.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…

Story img Loader