मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी हे वाणिज्य शाखेचे आहेत. या वर्षी सर्व विद्याशाखांना मिळून ७९,५४९ विद्यार्थ्यांनी आयडॉलला प्रवेश घेतले. त्यापैकी ६४ टक्के म्हणजे ५०,९८७ विद्यार्थी हे केवळ वाणिज्य शाखेचे आहेत. बीकॉम, एमकॉम, पीजीडीएफएम आदी वाणिज्य शाखेला या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या वर्षी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये बीएए, एमकॉम, एमए आणि एमए (शिक्षणशास्त्र) या अभ्यासक्रमामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-10-2014 at 05:28 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commerce ahead in distance education