‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा’च्या पाचव्या व्यावसायिक परिषदेच्या निमित्त व्यवस्थापन, वित्त आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एका सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक स्पर्धेसाठी तयारी हा या परिषदेचा विषय असणार आहे. त्यात विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता गुण वाढावेत या हेतूने ‘मध्यम व लघु उद्योजकता आणि कौशल्य विकास’ या विषयावरील सादरीकरणाची स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेली पहिली तीन सादरीकरणे परिषदेत सर्व पाहुण्यांसमोर सादर करण्यात येतील. त्यातून तीन क्रमांक निवडण्यात येतील. त्यांना ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. यापैकी २० टक्के रक्कम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येईल. शिक्षकांना परिषदेत हजर राहून आपापल्या विद्यार्थी संघांची ओळख करून द्यावी लागेल. या वर्षीपासून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या शेजारील महाविद्यालयांकरिताही खुली करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – रशिदा दोहादवाला – ८४५१०४६७५२, डॉ.मिनू मेहता – ९८२१४७५५५५.

Story img Loader