अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने उद्या, शनिवारी अकोल्यातील कृषी प्रदर्शनात माजी कुलगुरूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यात वादग्रस्त कुलगुरूंचा सत्कारही करण्यात येणार असल्याने कृषी विद्यापीठ वर्तुळात अनेकांनी नापसंती दर्शवली आहे. त्या दोन वादग्रस्त कुलगुरूंमध्ये डॉ. शरद निंबाळकर आणि डॉ. व्यंकट मायंदे यांचा समावेश आहे.२००५ मध्ये डॉ.निंबाळकर कुलगुरू असताना कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांच्या १३१ पदांच्या नियुक्तयांमध्ये अनियमितता आढळून आल्याने  सेवानिवृत्त न्या. एच.डब्ल्यू.धाबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला होता. तसेच अनागोंदीसंदर्भात दोन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांकडून चौकशी सुरू आहे. डॉ. मायंदे यांच्या काळातील नियुक्तांतील गैरप्रकार झाले होते.

Story img Loader