अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी उमेदवार बनवेगिरीच्या कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचे प्रत्यंतर ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थेच्या ‘सामाईक प्रवेश चाचणी’त (कॅट) करण्यात आलेल्या गुणांच्या फेरफारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील एनएमआयएमएस या व्यवस्थापन शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी काही उमेदवारांनी आपल्या ऐवजी डमी उमेदवारांना लेखी परीक्षेस बसवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे गैरमार्गाने नामवंत व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेश देणारी मोठी टोळीच देशभर कार्यरत असल्याची शंका व्यक्त होते आहे.
आयआयएमच्या ‘कॅट’मध्ये ८० उमेदवारांच्या गुणांमध्ये गैरपद्धतीने फेरफार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आयआयएमच्या प्रवेश प्रक्रियेवरील विश्वासार्हतेलाच यामुळे तडा गेला आहे. अत्यंत कमी गुण मिळालेल्या काही उमेदवारांचे गुण तर अशा पद्धतीने बदलण्यात आले होते की हे उमेदवार दर्जेदार आयआयएमधील प्रवेशासाठी पात्र ठरले असते.
आयआयएमला एका निनावी व्यक्तीने दूरध्वनीवर संपर्क साधून ‘टीप’ दिल्यामुळे हा गैरप्रकार उघडकीला तरी आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०१२ मध्ये कॅटची संगणकाच्या माध्यमातून परीक्षा झाली. परीक्षेची आणि मूल्यांकनाची जबाबदारी ‘प्रोमेट्रिक’ या खासगी संस्थेकडे होती. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याची जबाबदारी ‘वेब वेव्हर्स’कडे असल्याने प्रोमेट्रीकने तो निकाल या खासगी कंपनीच्या ताब्यात दिला. पण, वेब वेव्हर्सवरील निकालात आणि प्रोमेट्रिककडील निकालात काही उमेदवारांच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत दिसली.
प्रवेश प्रक्रियेला बाधा नाही.
प्रवेशासाठीची शॉर्टलिस्ट मूळ माहितीच्या (मास्टर डेटा) आधारे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे, ऑनलाइन निकालातील फेरफारामुळे प्रवेश प्रक्रियेला कोणतीही बाधा होणार नाही. आयआयएम वगळता ज्या शिक्षणसंस्था कॅटच्या गुणांच्या आधारे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही मूळ माहिती पुरविण्यात आली आहे. आयआयएमचे कॅट परीक्षा समन्वयक
‘आयआयएम’ प्रवेश प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह
अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी उमेदवार बनवेगिरीच्या कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचे प्रत्यंतर ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थेच्या ‘सामाईक प्रवेश चाचणी’त (कॅट) करण्यात आलेल्या गुणांच्या फेरफारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
First published on: 29-06-2013 at 12:44 IST
TOPICSआयआयएम
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubt on credibility of iim entrance test