शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आíथक आणि सामाजिक दुर्बल घटकांतील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यातही तब्बल ८० शाळांना एकही अर्ज आलेला नाही. या टप्प्याची लॉटरी शनिवारी काढण्यात आली. या फेरीत ८०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत प्रवेशनिश्चिती करावयाची आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मुंबई आणि परिसरातील आíथक व सामाजिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षणाच्या प्रवेशासाठी यंदा ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात पार पडला होता. पहिल्या टप्प्यात अर्जाची संख्या तुलनेत कमी आली होती, तसेच अनेक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले होते यामुळे दुसरा टप्प्याची सुरुवात करण्यात आली होती. या टप्प्याची लॉटरी शिक्षणाधिकारी कार्यालय िहदू कॉलनी येथे काढण्यात आली.