प्राथमिक वर्गासाठीचा परिसर अभ्यास ही भूगोलाच्या अभ्यासाची पहिली पायरी म्हणता येईल. भूगोल आणि परिसर अभ्यास हे एकमेकाला पूरक विषय आहेत. परीक्षेच्या दोन्ही भागांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोन्ही विषयांचा एकत्रित अभ्यास करणे योग्य ठरते.
परिसर अभ्यास म्हणजे काय?
परिसर व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा विविधांगी अभ्यास म्हणजेच ‘परिसर अभ्यास’ होय. या अभ्यासात आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा अभ्यास करून, त्यांच्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करणे अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भूगोल म्हणजे काय?
पृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक व भौतिक घडामोडींचा मानवाच्या संदर्भात र्सवकष विचार करणारे शास्त्र म्हणजे ‘भूगोल’ होय. भूगोलाच्या अभ्यासातून बालकाच्या बौद्धिक, भावात्मक, क्रियात्मक अशा तिन्ही अंगांच्या विकासाला प्राधान्य दिले गेले आहे. भूगोलातून जीवनाभिमुखता, समाजाभिमुखता प्राप्त होते.
महत्त्वाचे मुद्दे –
-भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वतप्रणालींची संख्या ७ आहे.
-आकारमानाचा विचार करता जगात सातव्या स्थानावर असलेला भारत लोकसंख्येचा विचार करता जगातील दुसरा देश आहे.
-तांदळाचे सर्वाधिक उत्पादन देणारे भारतातील राज्य पश्चिम बंगाल.
-भारतातील आसाम या राज्याची सीमा जास्तीत जास्त म्हणजे सात राज्यांना भिडलेली आहे.
-भारतीय द्वीपकल्पापासून सुमारे ७०० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान-निकोबार या बेट समूहावरील ‘इंदिरा गांधी पॉईंट’ हे भारतीय संघराज्याचे अतिदक्षिणेकडील टोक होय.
-भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण गंगानगर (राजस्थान)
-आकारमानाचा विचार करता ‘राजस्थान’ हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे.
-गंगा-ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन म्हणून ओळखले जाते.
-१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
-१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.
-‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर अहमदनगर व नाशिक या जिल्ह्य़ांच्या सीमेवर आहे.
-बांबूच्या वनांचे सान्निध्य लाभलेल्या ‘देसाईगंज’ या गडचिरोली जिल्ह्य़ातील ठिकाणी बाबूंच्या लगद्यापासून कागद बनविण्याचा कारखाना उभारला गेला आहे.
-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था पुणे येथे आहेत.
-क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा होय.
-‘रोशा’ जातीचे गवत राज्यात धुळे, नंदूरबार व जळगाव या जिल्ह्य़ामध्ये मोठय़ा प्रमामावर आढळते.
-बिडय़ा तयार करण्यासाठी तेंदूची पाने वापरतात. तेंदूची झाडे नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्य़ातील जंगलांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात.
-प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण ‘विल्सन बंधारा’ म्हणूनही ओळखले जाते.
-पुण्यातील खडकी येथे अॅम्युनिशन फॅक्टरी (दारुगोळा कारखाना) आहे.
-महाराष्ट्रात अप्पर वर्धा येथे केंद्र शासनाच्या मदतीने मत्स्यबीज केंद्र कार्यरत आहे.
-पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते.
-फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात पुणे येथे आहे.
-महाराष्ट्रातून निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे रेडी बंदरातून निर्यात होते. रेडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आहे.
-रायगड जिल्ह्य़ात कर्जत येथे भात संशोधन केंद्र आहे.
-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे आहे.
-गोंदिया जिल्ह्य़ातील ‘बोदलकसा’ येथे व्याघ्र प्रकल्प आहे.
-वातावरणातील ओझोन वायूची जाडी मोजण्यासाठी डॉबसॉन हे एकक वापरतात.
-काळ्या मृदेस रेगूर मृदा म्हणतात.
-हिमालयातील लडाख रांग ही शीत वाळवंट म्हणून ओळखली जाते.
-भागीरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो.
-महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.
-पैठण येथील ‘मंदिल’, ‘तुक्की’ आणि ‘दसली’ तसेच गुजराती फेटे प्रसिद्ध आहेत.