‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन व्हावे यासाठी १४ फेब्रुवारीपासून हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत ही सेवा उपलब्ध राहील. मुंबई विभागीय मंडळाच्या २७८८१०७५ आणि २७८९३७५६ या दूरध्वनी क्रमांकावर ही सेवा २६ मार्चपर्यंत मिळेल. या हेल्पलाईनवरून समुपदेशकांचे मार्गदर्शनही लाभेल.
दरम्यान, मुंबई विभागीय मंडळाकडून परिक्षेबाबतची माहिती वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. http://www.sscboardmumbai.in या संकेतस्थळावर बारावी परीक्षेचे वेळापत्रक, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्य़ांची बैठक व्यवस्था आणि ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील मुख्य केंद्रांची यादी उपलब्ध आहे, असे विभागीय सचिव सु. बा. गायकवाड यांनी कळविले आहे.

Story img Loader