तपासणी), कार्पोरेट फायनान्स (कंपनी वित्त), टॅक्सेशन (कर निर्धारण), कार्पोरेट गव्हर्नन्स (कंपनी प्रशासन) असे विविध करिअर पर्याय सनदी लेखापालांना उपलब्ध असतात. स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो.
व्यवस्थापकीय सल्लागार सेवा : व्यवसाय आणि उद्योगांकडे असलेल्या संसाधनांच्या प्रभावी वापरासाठी सनदी लेखपाल साहाय्य करू शकतात. वित्तीय आणि व्यूहात्मक व्यवस्थापन, नियोजन आणि वित्तीय धोरण निर्धारण या बाबींमध्ये सनदी लेखापाल सल्ला देऊ शकतात. व्यावसायिकांना आणि व्यक्तींना कर नियोजन आणि करांबाबत असलेल्या तक्रारी आणि त्रुटींचे निवारण करण्यास ते साहाय्य करू शकतात. शासकीय संस्थांपुढे ते आपल्या ग्राहकाची बाजू सादर करतात. उद्योग आणि शासकीय विभागांत सनदी लेखापालांना मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यान्वयन अधिकारी अशासारखी जबाबदारीची पदे भूषविता येऊ शकतात. सनदी लेखापालांना पीएच.डी.ची संधी देशातील ९० विद्यापीठे आणि सहा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट देतात. भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगळुरू ही संस्था प्रवेशप्रक्रियेत सनदी लेखापालांना प्राधान्य देते.
सनदी लेखापाल कसे व्हाल?
दहावीनंतर कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्टसाठी (सीपीटी) संस्थेकडे नावनोंदणी करता येते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सीपीटीला परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. त्यानंतर इंटरमिजिएट प्रोफिशिएन्सी कोर्स (आयपीसी)च्या गट एक किंवा गट दोन किंवा दोन्ही गटांसाठी नावनोंदणी करावी. प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होण्याआधी ३५ तास कालावधीचा व एक आठवडय़ाचा ओरिएंटेशन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञानाशी निगडित १०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतर इंटरमिजिएट प्रोफिशिएन्शी अभ्यासक्रमाला बसावे लागते. आठ महिन्यांचा अभ्यासक्रम संपल्याबरोबर ही परीक्षा होते. इंटरमिजिएट प्रोफिशिएन्सी अभ्यासक्रमामधील गट एक किंवा दोन्ही गट उत्तीर्ण झाल्यावर प्रत्यक्ष सराव (प्रॅक्टिकल) प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागते. पहिल्या वर्षीच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणाच्या कालावधीत १५ दिवसीय सामान्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य अभ्यासक्रम (प्रथम) पूर्ण करावा लागतो.
१८ महिन्यांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी १५ दिवसीय सामान्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य अभ्यासक्रम (द्वितीय) पूर्ण करावा लागतो. आधी उत्तीर्ण केली नसल्यास इंटरमिजिएट परीक्षा- गट दोन उत्तीर्ण करावी लागते. यानंतर सनदी लेखापाल अंतिम परीक्षेसाठी नोंदणी करून या परीक्षेची तयारी करावी लागते. प्रॅक्टिकल प्रशिक्षणाच्या तिसऱ्या वर्षांत आणि अंतिम परीक्षेला बसण्यापूर्वी प्रगत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. तीन वर्षे कालावधीचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अंतिम परीक्षेला बसता येईल किंवा शेवटच्या सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरू असताना या परीक्षेला बसता येते. त्यानंतर अंतिम परीक्षा देता येते. त्याआधी सामान्य व्यवस्थापन व संवाद कौशल्य (जनरल मॅनेजमेन्ट आणि कम्युनिकेशन स्किल्स) अभ्यासक्रम- पूर्ण करणे बंधनकारक असते. त्यानंतर द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउण्ट्स ऑफ इंडियाकडे नावनोंदणी केल्यानंतर उमेदवाराला सनदी लेखापाल संबोधण्यात येते.
थेट प्रवेश मार्ग : ज्या वाणिज्य पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधरास ५५ टक्के गुण किंवा इतर शाखेतील पदवी किंवा पदवीधरास ६० टक्के गुण मिळाले असल्यास त्यांना हा अभ्यासक्रम थेट करता येतो.
प्रवेशमार्ग एक :
* इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करून एक आठवडय़ाच्या कालावधीचा आणि ३५ तासांमध्ये विभागण्यात आलेला ओरिएन्टेशन अभ्यासक्रम आणि १०० तासांचे माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण पूर्ण करावे.
* तीन वर्षांच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी नाव नोंदवावे.
* पहिल्या वर्षीच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणाच्या कालावधीत सामान्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य -(एक)
अभ्यासक्रम पूर्ण करावे.
* प्रॅक्टिकल प्रशिक्षणाच्या ९ महिन्यांनंतर आणि इंटरमिजिएट इंटिग्रेटेड प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी
केल्यानंतरच्या तारखेपासून आठ महिन्यांच्या अभ्यासानंतर इंटरमिजिएट इंटिग्रेटेड प्रोफेशनल अभ्यासक्रमाची परीक्षा द्यावी लागते.
* इंटरमिजिएटच्या दोन्ही गटांच्या परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण व्हाव्या लागतात.
* सीए अंतिम परीक्षेसाठी नोंदणी करून या परीक्षेची तयारी करावी.
* प्रशिक्षणाच्या शेवटच्या १९ ते ३६ महिन्यांच्या कालावधीत सामान्य व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य अभ्यासक्रम (दोन) पूर्ण करावे लागते.
* प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या तिसऱ्या वर्षांत आणि अंतिम परीक्षेच्या आधी प्रगत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
* तिसऱ्या वर्षांच्या प्रॅक्टिकल प्रशिक्षणाच्या शेवटच्या सहा महिन्यांत अंतिम परीक्षा द्यावी लागते.
* अंतिम परीक्षा उत्तीर्ण व्हावी झाल्यानंतर द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउण्ट्स ऑफ इंडियाकडे नावनोंदणी केल्यानंतर उमेदवारास सनदी लेखापाल असे संबोधले जाते. प्रवेशमार्ग दोन : द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाउण्ट्सच्या इंटरमिजिएट स्तराची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या इंटरमिजिएट इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी करावी लागेल. इतर मुद्दे वर नमूद एकमधील चौथ्या मुद्दय़ापासून समान राहतील.
सनदी लेखापाल अभ्यासक्रम :
कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट : भाग एक : फंडामेन्टल्स ऑफ अकाउंटिंग (लेखा परीक्षणाचे मूलभूत सिद्धांत), भाग दोन-र्मकटाइल लॉ (व्यापारविषयक कायदे), भाग तीन- जनरल इकॉनॉमिक्स, भाग चार- क्वॉन्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, इंटरमिजिएट (इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स) अभ्यासक्रम.
गट एक :
* अकाउिण्टग
* बिझनेस लॉज इथिक्स अॅण्ड कम्युनिकेशन
* कॉस्ट अकाउिण्टग अॅण्ड फायनान्शिअल मॅनेजमेंट
* टॅक्सेशन,
गट दोन :
अॅडव्हान्स्ड अकाउिण्टग, ऑडिटिंग अॅण्ड अॅशुरन्स, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेन्ट.
अंतिम : गट एक :
* फायनान्शिएल रिपोìटग
* स्ट्रॅटेजिक फायनान्शिएल मॅनेजमेन्ट
* अॅडव्हान्स्ड ऑडिटिंग अॅण्ड प्रोफेशनल इथिक्स
* कार्पोरेट अॅण्ड अलाइड लॉजे.
गट दोन- अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट अकाउिण्टग, इन्फम्रेशन सिस्टिम्स कन्ट्रोल अॅण्ड ऑडिट, डायरेक्ट टॅक्स लॉज संपर्क – १) बोर्ड ऑफ स्टडीज, द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टण्ट्स ऑफ इंडिया, आयसीआयए भवन- ए- २९, सेक्टर ६२, नॉयडा-२०१३०९, दूरध्वनी-०१२०-३०४५९३१, ईमेल- bosnoida@icai.org, वेबसाइट- http://www.icai.org २) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ आयसीएआय, आयसीआयए भवन- २७ कफ परेड, कुलाबा, मुंबई- ४०००५, दूरध्वनी-०२२-३९८९ ३९८९ ईमेल- wro@icai.org वेबसाइट- http://www.wirc-icai.org
चार्टर्ड अकाउंटण्ट्स व्हायचंय?
अत्यंत प्रतिष्ठित करिअर मानल्या जाणाऱ्या ‘चार्टर्ड अकाउंटण्टस्’ अभ्यासक्रमाचे विविध टप्पे, शैक्षणिक संस्था आणि करिअरसंधींविषयीची माहिती- तपासणी), कार्पोरेट फायनान्स (कंपनी वित्त), टॅक्सेशन (कर निर्धारण), कार्पोरेट गव्हर्नन्स (कंपनी प्रशासन) असे विविध करिअर पर्याय सनदी लेखापालांना उपलब्ध असतात. स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2013 at 05:58 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to become a chartered accountant