दहावी- बारावीनंतर असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कल जोखून अचूक अभ्यासक्रमाची निवड करणे अवघड असते. पदवी अभ्यासक्रमाची निवड करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते. त्याविषयी…
दहावीची परीक्षा हा प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी- पालकांना काहीसा ताणही जाणवत असतो. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे नेमके काय फळ मिळेल,याविषयी विद्यार्थी साशंक असतात. ही साशंकता, हा ताण कमीकरण्यासाठी आणि करिअरची पुढची दिशा निश्चित करण्यासाठी दहावीनंतरचे विविध अभ्यासक्रम जाणून घेणे इष्ट ठरते.
दहावीतील गुणांवरच विद्यार्थ्यांला चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळणं सोपं होतं. दर्जेदार महाविद्यालये आणि उत्तम शिक्षकवर्गाच्या आधारे पुढील शैक्षणिक वाटचाल सुकर होऊ शकते. वैद्यकशाखा आणि अभियांत्रिकीच्या पलीकडेही करिअरचे असंख्य चांगले पर्याय उपलब्ध आहेत, हे पालक-विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.
..बुद्धय़ांक आणि कल :
मुलांचा बुद्धय़ांक आणि कल पालकांनी जाणून घ्यायलाहवा. प्रत्येक विद्याथ्याच्या काही सकारात्मक बाजू असतात, हेशिक्षक आणि पालकांनी ओळखायला हवे. आजच्या काळात
मुलांचा बुद्धय़ांक आणि अॅप्टिटय़ूड टेस्ट घेणाऱ्या संस्था अनेकठिकाणी कार्यरत आहेत. अशा संस्थांनी विकसित केलेल्या तंत्रांचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण खरं तर आपल्या
मुलांचा कल कुठल्या विषयाकडे अधिक आहे, हे पालकांना अधिक उत्तमरीत्या जोखता येऊ शकते. कारण काही हुशार मुलं अशा प्रकारच्या चाचण्यांना गुंगारा देऊ शकतात. त्यामुळे त्याच्या
मनातला कल आणि प्रत्यक्ष चाचणीतला कल यात तफावत असू शकते. अशा चाचण्यांमधून पालकांच्या सुप्त मनात दडलेला कल व्यक्त झाला तर त्यांच्या दृष्टीने अशी चाचणी यशस्वी झाली, असं समजून ते स्वत:ची पाठ थोपटून घेतात. ‘हाच मुलांचा खरा कल’असं समजून खूश होतात. अॅप्टिटय़ूड टेस्टच्या चाचणीतूननिघालेल्या निष्कर्षांवर आधारित करिअरचे पर्याय सुचवलेजातात. या चाचणीचे निकाल ब्रह्मवाक्य समजून मुलाच्याकरिअरची दिशा निश्चित झाल्याचा आनंद पालकांना होतो. मात्र, हा भ्रमाचा भोपाळा ठरू शकतो, ही खूणगाठ पक्की मनाशी बांधायला हवी.
..नवे पर्याय :
मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून जर मुलांच्याशिक्षणाची दिशा ठरवली गेली तर आज निर्माण झालेले अनेक प्रश्न हळूहळू कमी होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत करिअरच्या संकल्पना बदललेल्या आहेत. विविध नवी क्षेत्रे विकसित होतअसून त्यात कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना चांगलीसंधीसुद्धा मिळू लागली आहे. बदलत्या प्रवाहांची दखल घेऊन नवे अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांनी सुरू केले आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, ज्वेलरी आणि फॅशन डिझायिनग, हॉटेल मॅनेजमेंट, फूटवेअर डिझायिनग, अॅनिमेशन, साऊंड रेकॉडिर्स्ट, टुरिझम मॅनेजमेंट, मरीन इंजिनीअिरग, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फमॅटिक्स, योग या काही क्षेत्रांचा झपाटय़ाने विस्तार झालाअसून या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरजही वाढली आहे.
दहावीनंतर व्होकेशनल कोस्रेसला जाणीवपूर्वक जाण्याची मानसिकताही तयार व्हायला हवी. एक-दोन वर्षांचे हे व्यावसायिक अभ्यासक्रम करिअरसाठी सहाय्यभूत ठरू शकतात. सध्या सर्वत्र चांगल्या छोटय़ा छोटय़ा तंत्रज्ञांची कमतरता भासू लागलीय. ग्राहकांना चांगली सेवा हवी आहे. त्यासाठी ते पसाहीखर्च करायला तयार आहेत, मात्र, सेवा देणाऱ्यांचीच कमतरता भासते. पालकांनी एकूणच बदललेल्या परिस्थितीचा विचार स्वत:करायला हवा. महागडे शिक्षण, आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, मुलाची बुद्धिमत्ता आणि कल, आणि भविष्यातीलअनिश्चितता यांचा साकल्याने विचार केला तर मुलांच्या करिअरचे चित्र अधिक सकारात्मक होऊ शकते.
..डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अॅण्ड मेन्टनन्स :
केंद्र सरकारच्या डिपार्टमेन्ट ऑफ इन्फम्रेशन टेक्नालॉजीआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेसंयुक्तपणे औरंगाबाद येथे DOEACC केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वी ही संस्था सेंटर फॉर इलेक्ट्रानिक्स डिझाइन अँड टेक्नॉलॉजी या नावे ओळखली जायची. यासंस्थेमार्फत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अॅण्ड मेन्टनन्स हा अभ्यासक्रम चालविला जातो. प्रत्येक वर्षांच्या जुल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होतो. ही संस्था भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. यासंस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आणि सहा सत्रांतविभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभजुलच्या तिसऱ्या आठवडय़ात होईल. विद्यार्थ्यांला दहावी परीक्षेत 50 टक्के गुण मिळायला हवेत. (अनुसूचित जाती आणि जमातीविद्यार्थी 45 टक्के) विद्यार्थ्यांचे वय 1 जुल 2013 रोजी 15 वर्षांच्या खाली आणि 18 वर्षांच्या वर असू नये. विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. ही परीक्षा जून किंवा जुल महिन्यात घेतली जाईल. या परीक्षेद्वारे गणित आणि विज्ञान विषयाच्या मूलभूत ज्ञानाची चाचणी घेतलीजाईल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील. पेपरऑब्जेक्टिव्हज् म्हणजेच वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचाराहील. या परीक्षेची भाषा इंग्रजी राहील. 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक सत्राची फी सहा हजार रुपये. संस्थेनेहॉस्टेलची व्यवस्था केली आहे. याची फी प्रत्येक सत्राला दोन हजार रुपये. संपर्क पत्ता : DOEACC सेंटर (सेंटर फॉरइलेक्ट्रॉनिक्स डिझाइन अँड टेक्नॉलॉजी) युनिव्हर्सिटी कॅम्पस, औरंगाबाद 431004, दूरध्वनी-0240-2400120, वेबसाइट www.
doeccsaurangabad.org.in, ईमेल info@doeccsaurangabad.org.in
..डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी :
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लॉस्टिक इंजिनीअिरग टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या रसायने आणि खते याविभागाने केली आहे. प्लास्टिक तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणप्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील प्रमुख संस्था होय. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील चार अभ्यासक्रम या संस्थेने सुरू केले आहेत.
- डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी. या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 वर्षे.
- पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी. याअभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षे. हा इंटिग्रेटेड डय़ूएलडिप्लोमा अभ्यासक्रम आहे.
- डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी. या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 वर्षे.
- पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी.
या अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षे. हा इंटिग्रेटेड डयूएलडिप्लोमा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊइच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने दहावीला गणित, इंग्रजी आणि शास्त्र हेविषय घेतलेले असावेत. विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे असावे. अनुसूचित जाती आणि जमाती उमेदवारांसाठी वयात तीन वर्षांचीसवलत उपलब्ध आहे.
संपर्क पत्ता : प्लॉट, नं. 630, फेज फोर, जीआयडीसी, अहमदाबाद, 382445, दूरध्वनी-079-40083901, ईमेल Fcipet@gmail.com/ सेक्टर जी, गोिवदपुरा इंडस्टिअल इस्टेट. भोपाळ-462023.