महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ‘बीएसएनएल’ने ‘एसएमएस’च्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली आहे.
‘एसएमएस’वर निकाल मिळविण्यासाठी ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांनी मोबाईलवर टऌऌरउ असे टाइप करावे त्यापुढे स्पेस देऊन परीक्षार्थीचा आसन क्रमांक टाइप करावा.
हा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठविल्यास निकाल मिळू शकेल. प्रत्येक निकालासाठी एक रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे, असे ‘बीएसएनएल’कडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा