देशातील १६ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास १७,३२९ विद्यार्थ्यांनी रस दाखविला आहे. या विद्यार्थ्यांकरिता १ जुलैला पहिली जागावाटप यादी लावली जाणार आहे.
यंदा जेईई-अ‍ॅडव्हान्समधून १८,०७७ विद्यार्थ्यांना प्रवेश पात्र ठरविले होते. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या जास्त होती. परंतु, यापैकी ७४८ जणांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले आहे. आयआयटीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. परंतु, सकाळपासूनच तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे, अर्ज भरण्यासाठी मुदत सायंकाळी ६ पासून रात्री १०पर्यंत वाढविण्यात आली होती.

Story img Loader