देशातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या पाच वर्ष कालावधीच्या एकात्मिक
अभ्यासक्रमांची माहिती…
गेल्या तीन-चार वर्षांत इन्टिग्रेटेड अर्थात एकात्मिकअभ्यासक्रमांचा नवा ट्रेण्ड रुजत आहे. इन्टिग्रेटेड अभ्यासक्रम हा पाच र्वष कालावधीचा अभ्यासक्रम असतो. याचा सोपा अर्थअसा की, बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की, मग पदव्युत्तर पदवीपर्यंत काळजीचं कारण नाही. हे अभ्यासक्रमअभियांत्रिकी, कला, वाणिज्य आणि विधी विद्याशाखांमध्ये उपलब्ध आहेत. चार र्वष कालावधीच्या इंटिग्रेटेड बॅचलर ऑफसायन्स अॅण्ड बीएड् किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड बीएडअसेही अभ्यासक्रम सुरू झाला आहे. अशा काही अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात
सेन्ट्रल युनिव्हर्सटिचे अभ्यासक्रम :
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या विद्यापीठांमध्ये माफक शुल्कआकारून विविध शाखांमधील सुमारे २०० अभ्यासक्रम सुरूकरण्यात आले आहेत. सामायिक प्रवेश चाचणीद्वारे सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ बिहार, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ गुजरात, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ जम्मू, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफझारखंड, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ काश्मीर, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ केरळ, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ ओरिसा, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ पंजाब, सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ राजस्थान,
सेन्ट्रल युनिव्हर्सटिी ऑफ तामिळनाडूमध्ये बारावीनंतरच्या विविधअभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. विद्यापीठनिहाय हेअभ्यासक्रम पुढीलप्रमाणे
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ बिहार :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलरऑफ आर्ट्स अॅण्ड एलएलबी आणि इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफसायन्स अॅण्ड एलएलबी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बॅचलरऑफ सायन्स अॅण्ड बीएड आणि बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड बीएड हे प्रत्येकी चार र्वष कालावधीचे डय़ुअल डिग्रीअभ्यासक्रमसुद्धा सुरू आहेत. संस्थेची वेबसाइट – http://www.cub.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ गुजरात :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड मास्टर ऑफआर्ट्स इन चायनीज लँग्वेज अॅण्ड कल्चर, इन्टिग्रेटेड मास्टरऑफ आर्ट्स इन जर्मन स्टडीज आणि इन्टिग्रेटेड मास्टर ऑफआर्ट्स इन सोशल मॅनजमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेआहेत. संस्थेची वेबसाइट – http://www.cug.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ झारखंड :
या विद्यापीठात चार र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफसायन्स अॅण्ड बीएड आणि बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड बीएड हेअभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पाच र्वष कालावधीचेइन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड मास्टर ऑफ आर्ट्स इनइंग्लिश स्टडीज, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड मास्टरऑफ आर्ट्स इन फार इस्टर्न लँग्वेजेस (चायनीज, कोरियन, तिबेटन), इन्टिग्रेटेड बॉचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड मास्टर ऑफआर्ट्स इन इंडिजनस कल्चर स्टडीज, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफआर्ट्स अॅण्ड मास्टर ऑफ आर्ट्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू आहेत. पाच र्वषकालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनअॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, पाच र्वषकालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टरऑफ टेक्नॉलॉजी इन वॉटर इंजिनीअिरग अॅण्ड मॅनेजमेंट, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफटेक्नॉलॉजी इन एनर्जी इंजिनीअिरग, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफटेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन नॅनो टेक्नॉलॉजी, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मास्टर ऑफटेक्नॉलॉजी इन जिओइन्फॉर्मेटिक्स, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफसायन्स अॅण्ड मास्टर ऑफ सायन्स इन अप्लाइड फिजिक्स, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड मास्टर ऑफ सायन्स इनअप्लाइड केमिस्ट्री इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड मास्टरऑफ सायन्स इन अप्लाइड मॅथेमॅटिक्स, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफसायन्स ऑण्ड मास्टर ऑफ सायन्स इन एन्व्हॉरन्मेन्टल सायन्स, इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड मास्टर ऑफ सायन्स इन लाइफ सायन्सेस हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्यात आले आहेत. संस्थेची वेबसाइट-www.cuj.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ काश्मीर :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलरऑफ सायन्स अॅण्ड एलएलबी आणि इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफआर्ट्स अॅण्ड एलएलबी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेआहेत. संस्थेची वेबसाइट-www.cukashmir.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ ओरिसा :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचा इन्टिग्रेटेड मास्टर ऑफसायन्स इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेची वेबसाइट-www.cuo.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ राजस्थान :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड मास्टर ऑफसायन्स इन बायोटेक्नालॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन बायोकेमेस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स, मास्टरऑफ सायन्स इन एन्व्हॉरन्मेन्टल सायन्स, मास्टर ऑफ सायन्स इन मायक्रोबायोलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन स्टॅटिस्टिक्स हेअभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सहा र्वषकालावधीचे इन्टिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बीएड इनकेमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बीएड् इन इकॉनॉमिक्स,
मास्टर ऑफ सायन्स अॅण्ड बीएड इन मॅथेमॅटिक्स, मास्टर ऑफसायन्स अॅण्ड बीएड इन फिजिक्स हे सुध्दा अभ्यासक्रम सुरूकरण्यात आले आहेत. संस्थेची वेबसाइट-www.curj.ac.in
सेन्ट्रल युनिव्हर्सटि ऑफ तामिळनाडू :
या विद्यापीठात पाच र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड मास्टर ऑफसायन्स इन फिजिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन केमेस्ट्री, मास्टरऑफ सायन्स इन लाइफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स हे अभ्यासक्रम तसेच चार र्वष कालावधीचे इन्टिग्रेटेड बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड बीएड आणि बॅचलर ऑफ आर्ट्सअॅण्ड बीएड हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू करण्यात आले आहेत. संस्थेची वेबसाइट-www.cutn.ac.in
प्रवेश प्रक्रिया :
या सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा दोन पद्धतीने घेतली जाते. ऑनलाइन परीक्षा १८ आणि १९ मे २०१३ रोजी घेतली जाईल. ऑफलाइन परीक्षा १९ मे २०१३ला घेतली जाईल. २५ एप्रिल२०१३ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. ऑफलाइन अर्ज ३०एप्रिल २०१३ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षांचे महाराष्ट्रातील केंद्रे- पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. महाराष्ट्रात ऑफलाइन परीक्षेचं केंद्र नाही. पात्र असलेले विद्यार्थीतीन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यांना यापकीएकाच अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पसंतीक्रम भरणे आवश्यक ठरते.
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम :
या परीक्षेचा अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारितआहे. भाषेशी संबधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा पेपर हावर्णनात्मक राहील. यात दीर्घ आणि लघु उत्तरे लिहावी लागतील. इतर शाखांसाठीच्या प्रवेशासाठीचा पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा राहील. यामध्ये दोन भाग राहतील. पहिल्या भागात ३५ गुणांचे प्रश्न राहतील. हे प्रश्न इंग्रजी भाषेचं कौशल्य, सामान्य
अध्ययन आणि विश्लेषणात्मक कौशल्य यावर आधारितराहतील. दुसऱ्या भागात संबधित विषयावर आधारित प्रश्नराहतील. या परीक्षेचा निकाल जून २०१३च्या पहिल्याआठवडय़ात घोषित केला जाईल. आपल्या आवडीच्याअभ्यासक्रमासाठीचा प्रवेश हा या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरआधारित राहील. जितका विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम वरचा तितकीसंधी चांगली. वेबसाइट http://www.cucet2013.co.in ईमेल – admin@cucet2013.co.in
एकात्मिक अभ्यासक्रम
देशातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या पाच वर्ष कालावधीच्या एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती...
आणखी वाचा
First published on: 16-04-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information of education courses from different universities in india