केमिकल टेक्नॉलॉजी आणि सायन्स या विषयातील शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या मोजक्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ या संस्थेचा समावेश होतो. संस्थेतील पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरावरील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती –
राज्य शासनाच्या सीईटीचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य़ धरणारी, मात्र सामायिक प्रवेश चाचणीमध्ये सामील न होणारी महत्त्वाची संस्था म्हणजे इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. मुंबईस्थित या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. पत्ता- नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई- ४०००१९, दूरध्वनी०२२-३३६१११११, वेबसाइट- www.ictmumbai.edu.in ई-मेल- admissions@ictmumbau. edu.in
प्रवेशप्रक्रिया :
बॅचरल ऑफ केमिकल इंजिनीअिरग (बी. केम. इंजि.), बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक्.) या अभ्यासक्रमांच्या ७० टक्के जागा सीईटीच्या गुणांवर आधारित आणि ३० टक्के जागा या एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित भरल्या जातात. २०१३ सालच्या शैक्षणिक वर्षांपासून या जागा JEE-MAIN या परीक्षेतील गुणांवर आधारित भरल्या जातील. बॅचरल ऑफ फार्मसी (बी. फार्म.) या अभ्यासक्रमांच्या १०० टक्के जागा या सीईटीच्या गुणांवर आधारित भरल्या जातात.
देशातील आणि राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रवेशप्रक्रियेची जाहिरात साधारणत: शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन महिन्यांआधी प्रकाशित केली जाते. अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ही सीईटी आणि एआयट्रिपलईमधील गुणांवर आधारित स्वतंत्रपणे केली जाते. या यादीमध्ये सीईटी / एआयट्रिपलईमधील गुण, बारावीमधील गुण आणि प्रवर्ग (खुला / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / इतर मागास वर्ग वगरे) यांचा समावेश असतो. ही यादी संस्थेच्या नोटीस बोर्डवर आणि वेबसाइटवर लावली जाते.
संस्थेतील अभ्यासक्रम :
बॅचरल ऑफ केमिकल इंजिनीअिरग :
या अभ्यासक्रमाच्या एकूण ७५ जागा आहेत. सीईटीमार्फत५३ जागा, खुल्या गटात- २७ जागा, आरक्षित गटातील जागा२६. एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित २२ जागा भरल्या जातात. यामध्ये कोणतेही आरक्षण नाही. अखिल भारतीय पातळीवरील गुणानुक्रमांक यासाठी ग्राह्य धरला जातो.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी :
या अभ्यासक्रमाच्या १३६ जागा आहेत. सीईटीमार्फत- ९५ जागा, खुल्या गटात- ४८ जागा, आरक्षित गटात- ४७ जागा आणि एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित- ४१ जागा भरल्या जातात. यामध्ये कोणतेही आरक्षण नाही. अखिल भारतीय पातळीवरील रँक यासाठी गृहीत धरला जातो. या १३६ जागा पुढीलप्रमाणे विविध शाखांमध्ये भरल्या जातात-
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन डायस्टफ टेक्नॉलॉजी :
२० जागा. यापकी सीईटीमार्फत- १४ जागा, खुल्या गटासाठी- ७ जागा, आरक्षित गटासाठी- ७ जागा, एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ६ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन फायबर्स अॅण्ड टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी :
३४ जागा. यापकी सीईटीमार्फत- २५ जागा, खुल्या गटासाठी- १३ जागा, आरक्षित गटासाठी- १२ जागांचा समावेश आहे. एआयट्रीपलईच्या गुणांवर आधारित ९ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजी :
१६ जागा. यापकी सीईटीमार्फत- ११ जागा, खुल्या गटासाठी- ६ जागा, आरक्षित गटासाठी- ५ जागी, एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ५ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑइल्स, ओलेओ केमिकल्स अॅण्ड सर्फेस टेक्नॉलॉजी :
१६ जागा. यापकी सीईटीमार्फत- ११ जागा, खुल्या गटासाठी- ५ जागा, आरक्षित गटासाठी- ६ जागा आणि एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ५ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन फार्मास्युटिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी :
१८ जागा. यापकी सीईटीमार्फत- १२ जागा, खुल्या गटासाठी- ६ जागा, आरक्षित गटासाठी- ६ जागा आणि एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ६ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन पॉलिमर इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजी :
१६ जागा. यापकी सीईटीमार्फत- ११ जागा, खुल्या गटासाठी- ६ जागा, आरक्षित गटासाठी- ५ जागा आणि एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ५ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी :
१६ जागा. यापकी सीईटीमार्फत- ११ जागा, खुल्या गटासाठी- ६ जागा, आरक्षित गटासाठी- ५ जागा आणि एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ५ जागा भरल्या जातात.
बॅचरल ऑफ फार्मसी :
३० जागा. यामध्ये खुल्या गटासाठी- १५ जागा, आरक्षित गटासाठी- १५ जागांचा समावेश आहे.
अर्हता- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावीच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयात सरासरीने ३०० पकी १५० गुण मिळणे आवश्यक आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलेली असावी.
सीईटीच्या गुणांवर आधारित प्रवेशासाठी आणि एआयट्रिपलईच्या प्रवेशासाठी दोन स्वतंत्र अर्ज करावे लागतात. मात्र सीईटी परीक्षेत १०० वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असल्यासच अर्ज स्वीकृत केला जातो.
जागांचे आरक्षण :
या संस्थेत शासनाच्या नियमानुसार ५ टक्के जागा या टय़ूशन फी वेव्हर स्कीमखाली राखीव ठेवण्यात येतात. या योजनेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक फी माफ केली जाते. या राखीव गटासाठी सुयोग्य उमेदवार मिळाला नाही तर ही जागा रिक्त ठेवली जाते. सीईटीच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित केला जातो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षकि उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत प्रवेश मिळोलेल्या विद्यार्थ्यांला कोणत्याही स्थितीत नंतर शाखा बदलून दिली जात नाही.
प्रवेशप्रक्रिया :
या संस्थेची प्रवेशप्रक्रिया ही सीईटीचा निकाल लागल्यावर सुरू होते. तोपर्यंत एआयट्रिपलईचाही निकाल लागलेला असतो. या संस्थेच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि ट्रिपलईच्या गुणांचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना दोन अर्ज भरावे लागतात. या प्रवेशप्रक्रियेचे दोन भाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या भागात एआयट्रिपलईच्या गुणांवर आधारित ३० टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रवेशासाठी एकूण तीन फेऱ्या घेतल्या जातात.
शुल्क :
२०१२-१३ या शैक्षणिक वर्षांसाठी या संस्थेची पहिल्या वर्षांची खुल्या गटासाठी फी ४४ हजार ४०० रुपये होती. टय़ूशन फी वेव्हर योजनेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फ८ी २९ हजार ५०० रुपये होती. अनुसूचित जाती आणि जमाती व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही फी वार्षकि १३७५ रुपये होती.
सीईटीमध्ये १७५ आणि त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना एआयट्रिपलईमध्ये १५० च्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेतील विविध शाखांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी असते. संस्थेमध्ये विद्यार्थी आणि विद्याíथनींसाठी होस्टेलची सुविधा उपलब्ध आहे.