‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या देशातील नामवंत अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्रवेशासाठी ग्राह्य़ धरल्या जाणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’साठीची (जेईई) ऑनलाईन अर्ज नोंदणी ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. १५ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येतील.
जेईईचे स्वरूप या वर्षीपासून आमूलाग्र बदलण्यात आले असून मुख्य आणि अ‍ॅडव्हान्स अशा दोन स्वरूपात ही परीक्षा होईल. मुख्य परीक्षेत निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. या अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील गुणांच्या आधारे आयआयटीमधील प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. मुख्य परीक्षेचे गुण अन्य अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरले जातील.
मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागतील. मुख्य परीक्षा ऑफलाइन (लेखी) आणि ऑनलाइन (संगणकाच्या आधारे) अशा दोन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा ७ एप्रिलला तर ऑनलाइन परीक्षा ८ ते २५ एप्रिल दरम्यान घेतली जाईल.
या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थ्यांची निवड अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी करण्यात येणार आहे. अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे आयआयटीचे प्रवेश निश्चित केले जातील. मात्र, प्रवेश देण्यापूर्वी संबंधित विद्यार्थी त्या त्या शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेटाईलमध्ये आहे की नाही याची चाचपणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.    
महत्त्वाच्या तारखा
 जेईई (मुख्य)साठी ऑनलाईन नोंदणी – ८ नोव्हेंबर ते
१५ डिसेंबर, २०१२
 जेईई (मुख्य) ऑफलाईन परीक्षा – ७ एप्रिल, २०१३
 जेईई (मुख्य) ऑनलाईन परीक्षा – ८ ते २५ एप्रिल
 जेईई (मुख्य) निकाल जाहीर – ७ मे
 जेईई (अ‍ॅडव्हान्स)साठी पात्र ठरलेल्यांसाठी ऑनलाईन नोंदणी (परीक्षा शुल्कासह)- ८ ते १३ मे
 जेईई (अ‍ॅडव्हान्स)साठी प्रवेशपत्रांचे डाऊनलोडींग – १६ ते ३१ मे
 जेईई (अ‍ॅडव्हान्स)साठी परीक्षा होणार – २ जून
 निकाल जाहीर – २३ जून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा