ब्रिटन आणि भारत यांच्यातील शिक्षण व संशोधन क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भाग म्हणून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स यांच्या वतीने ५० नव्या शिष्यवृत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या भारतभेटीमध्ये या शिष्यवृत्त्यांची घोषणा करण्यात आली. यानुसार यंदाच्या वर्षांपासून अधिकाधिक विद्यार्थ्यांना जगप्रसिद्ध असलेल्या या संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येणार आहे. एप्रिल ३० २०१३ पासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांसाठी ३ हजार ते ३२ हजार पौंडांच्या अशा या शिष्यवृत्त्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनाच्या आवश्यकतेनुसार दिल्या जाणार आहेत.
शतकापासून भारतीय विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यासाठी येत आहेत. हजारो भारतीय विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. मात्र आर्थिक स्थिती बेताची असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना येथून शिक्षण घेता यावे, यासाठी या शिष्यवृत्त्या देण्यात आल्याचे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक प्राध्यापक क्रेग कालहून यांनी स्पष्ट केले.
भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या संधीसाठी स्वागत असल्याचा कॅमेरून यांचा संदेश त्यांनी या घोषणेतून मांडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा