थेट बारावीनंतरच व्यवस्थापन अभ्यासक्रम करण्याची संधी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ
मॅनेजमेंट’च्या इंदौर कॅम्पसमधील इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट आणि ‘टाटा इन्स्टिटय़ूट
ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेचा बॅचलर ऑफ आर्ट-मास्टर ऑफ आर्ट इन सोशल
सायन्सेस या अभ्यासक्रमाद्वारे मिळते. त्याविषयी..
व्यवस्थापन अभ्यासक्रमांची उर्वरित माहिती
दुसऱ्या मॉडय़ूलमध्ये व्यवस्थापनाच्या सर्व कार्यात्मक क्षेत्रांचा समावेश करण्यात येतो. यामध्ये-

  • अकौंटिंग
  • फायनान्स
  • ऑर्गनायझेशन बिव्हेरिएल
  • डिसिजन सायन्स
  • ऑपरेशन्स अ‍ॅण्ड सíव्हस मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स
  • इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी
  • कम्युनिकेशन
  • लीगल अ‍ॅसपेक्ट्स ऑफ बिझनेस
  • एथिक्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स
  • कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
  • बिझनेस स्ट्रेटेजी
  • इंटरनॅशनल बिझिनेस अ‍ॅण्ड इन्टरप्रिन्युअरशिप.

या भागावर ५० टक्केवेटेज राहील. १० टक्के वेटेज हे इंटरनॅशनल एक्सपोजर आणि भारतातील सामाजिक संस्थामधील इंटर्नशिपसाठी ठेवण्यात येतील.

संपर्क :

  • विहित नमुन्यातील अर्ज www.iimidr.ac.in या वेबसाइटवर ठेवण्यात आला आहे.
  • अर्जाची फी- खुल्या आणि इतर मागास वर्ग संवर्ग- १००० रुपये, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ५०० रुपये.
  • पत्ता- अ‍ॅडमिशन ऑफिस, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर, राऊ- पितमपूर रोड, इंदौर- ४५३५५६. दूरध्वनी-०७३१-२४३९६८९ ई-मेल- ipmadmissions@iimid.ac.in

बॅचलर ऑफ आर्ट- मास्टर ऑफ आर्ट इन सोशल सायन्सेस

  • समाजविज्ञान विषयात शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात देशातील आघाडीची संस्था म्हणून टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने देशात आणि परदेशातसुद्धा नाव कमावलं आहे. या संस्थेमार्फत विविध नावीन्यूपर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
  • या संस्थेने कलाशाखेतील पाच र्वष कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. बॅचलर ऑफ आर्ट- मास्टर ऑफ आर्ट इन सोशल सायन्सेस सुरू केलाय. तीन र्वष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच २०१५ साली या अभ्यासक्रमातून बाहेर पडता येईल किंवा २०१८ पर्यंत अभ्यासक्रम पुढे चालू ठेवून पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येईल.
  • हा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून गौहाटी, तुळजापूर आणि हैदराबाद येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. या तीन कॅम्पसमध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण १८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. कॅम्पसची निवड ऑनलाइन अर्ज करतानाच करावी लागेल.

अभ्यासक्रमासाठी अर्हता :

  • कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
  • १२ मे २०१३ रोजी विद्यार्थ्यांचे वय २३ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • शासनाच्या नियमाप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी १५ टक्के जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • २७ टक्के जागा इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • ३ टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव.
  • अर्जाची फी १०२० रुपये असून ती ऑनलाइन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता येते. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया चलनाद्वारेही भरता येते. स्टेट बँक ऑफ इंडिया चलनासाठी प्रोसेसिंग फी म्हणून ५० रुपये घेईल. तो अर्जाच्या फीचा भाग समजला जाणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज करताना कोणतेही प्रमाणपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नसते. समोरच्या भागाने चेहरा
    स्पष्टपणे दिसेल असा ५ एमबीचा फोटो अपलोड करावा लागतो.
  • एकापेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जातो. ऑनलाइन टेस्ट १२ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.
  • यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांचा समावेश आहे.

परीक्षेचा पॅटर्न :

  • या परीक्षेसाठी १०० गुण ठेवण्यात आले आहेत.
  • कालावधी ९० मिनिटांचा राहील.
  • या पेपरमध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन भाग राहतील. पार्ट ए मध्ये ६० गुणांचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील.
  • हे प्रश्न चालू घडामोडी, सामाजिक जागरूकता, तार्किक आणि विश्लेषण अशा प्रकारचे असतील.
  • पार्ट बी हा वर्णनात्मक स्वरूपाचा राहील. त्यावर ३० गुण राहतील.
  • यामध्ये दोन लघु उत्तरे लिहावी लागतील. यासाठी ४० गुण ठेवण्यात आले आहेत.
  • दोन्ही भाग विद्यार्थ्यांना सोडवणे आवश्यक आहे. दोन्ही भागांचे कटऑफ गुण वेगवेगळे राहतील.
  • या परीक्षेच्या एक महिनाआधी म्हणजे साधारणत: एप्रिल महिन्यात डेमो परीक्षा संस्थेच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अपलोड केली जाणार आहे. निकाल १ जून रोजी घोषित केला जाईल. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ जुलपासून होईल.

संपर्क- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, अपसिंगा रोड, वृद्धाश्रमाजवळ, तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद, पिनकोड- ४१३६०१, दूरध्वनी-०२४७१- २४२०६१, ईमेल- info@tiss.edu, वेबसाइट- http://www.tiss.edu, ईमेल- इअ – BA -admissions@tiss.edu.
(उत्तरार्ध)

Story img Loader