दहावी आणि बारावी या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवर विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांकडून उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे यांनी ‘करिअर निवडताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांनी ‘सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचा समारोप ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी’ या व्याख्यानाने झाला. ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी या विषयाबाबत मार्गदर्शन केले. या तीन तज्ज्ञ वक्त्यांसह ‘विद्यालंकार’च्या गणित विभागाचे प्रमुख हितेश मोरे, संकल्प आयएएस फोरमचे संतोष रोकडे, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे उल्हास माळवदे, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डिपार्टमेंटचे प्रा. रामभाऊ बडोदे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रिजनल लीड सेंटर-मुंबईचे संचालक इंद्रनील मयेकर यांनीही विशेष वक्ते म्हणून आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.
हा ‘मार्ग यशाचा’..
पालक आणि पाल्यांमध्ये सध्या हरवत चाललेला संवाद पुन्हा प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे. पालकांनी आपली मते किंवा अपेक्षा विद्यार्थ्यांवर लादू नयेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2015 at 05:04 IST
TOPICSमार्ग यशाचा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marg yashacha 19 june