राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या (एमबीए) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले असून २७ जानेवारीपासून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत. राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्यपातळीवरील सामयिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून घेण्याचे शासनाने जाहीर केले आहे. १५ आणि १६ मार्चला राज्यभरात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे असून २७ जानेवारीपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी १४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे, तर विलंब शुल्कासह १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येतील. खुल्या गटासाठी हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी आठशे रुपये परीक्षा शुल्क आहे. परीक्षेचे निकाल ४ एप्रिलला जाहीर होणार आहेत. त्यानंतर १२ मे पासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्याwww.dtemaharashtra.gov.in/mba2014  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Story img Loader