देशातील काही उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग क्षेत्राला आवश्यक ठरणारे तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अशा काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक उद्योगसमूहांनी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आणि त्याद्वारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले. अल्पावधीतच यातील अनेक संस्थांनी शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र ठसा निर्माण केला आणि नावही कमावले. उद्योगसमूहांनी सुरू केलेल्या अभ्यासक्रमांचा एक लाभ असा झाला की, संबंधित क्षेत्राला आवश्यक ठरणाऱ्या मनुष्यबळाला साजेसे अभ्यासक्रम यात सुरू करण्यात आले. त्या विशिष्ट क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयीन अथवा विद्यापीठीय अभ्यासक्रमांपेक्षा हे अभ्यासक्रम अधिक कालानुरूप बनले. तंत्रविषयक आणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांचा मिलाफ साधणाऱ्या एकात्मिक अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊयात-
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सटिी :
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सटिीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूलने बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षे कालावधीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
अर्हता- कोणत्याही शाखेतील ७० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सटिी अॅडमिशन टेस्ट- JAT घेतली जाते. या परीक्षेत १२० प्रश्न विचारले जातात. ४८ प्रश्न- व्हर्बल अॅबिलिटी, ४८ प्रश्न- लॉजिकल आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी, २५ प्रश्न-जनरल नॉलेजवर विचारले जातात. परीक्षेचा कालावधी – दोन तास. ही परीक्षा ३० जून २०१३ रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी संस्थेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. परीक्षेची फी- ५०० रुपये. हा अभ्यासक्रम १ ऑगस्ट २०१३ पासून सुरू होईल. पत्ता- ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सटिी, सोनिपत नरेला रोड, जगदीशपूर व्हिलेज, सोनिपत हरयाणा- १३१००१. फॅक्स-०१३०-१३०५७८०३. हेल्पलाइन- १८००१२३४३४३. वेबसाइट- www.jgbs.edu.in ई-मेल-admissions.jgbs@jgu.edu.in
थापर युनिव्हर्सटिी :
थापर उद्योग समूहाच्या थापर युनिव्हर्सटिीतर्फे अभियांत्रिकी शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने पारंपरिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसोबतच बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग) मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षे कालावधीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बी. ई. आणि एम.बी.ए. अशा दोन पदव्या प्रदान केल्या जातात. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी जेइइ-मेन २०१३ या परीक्षेतील गुण ग्राहय़ धरले जातील.
संपर्क- थापर युनिव्हर्सटिी, पोस्ट बॉक्स नंबर- ३२, पतियाळा १४७००४. हेल्पलाइन- ०८२८८००८१२०.
दूरध्वनी- ०१७५- २३९३०२१ वेबसाइट- www.thapar.edu ईमेल-admissions@thapar.edu
देवी अहिल्या विश्वविद्यालय :
इंदोरस्थित देवी अहिल्या विश्वविद्यालयाने विविध विषयांसाठी एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (१२० जागा)
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ई-कॉमर्स (एकूण जागा- ६०).
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन फॉरेन ट्रेड (एकूण जागा- ६०).
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन (एकूण जागा- ६०).
या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- पाच वर्षे
अर्हता :
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ई-कॉमस, मास्टर ऑफ बिझनेस
अॅडमिनिस्ट्रेशन इन फॉरेन ट्रेड, मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक मीडिया- कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उतीर्ण. ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन- जीवशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण. ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. परीक्षा केंद्रे : या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही प्रवेशपरीक्षा दिल्ली, इंदौर, भोपाळ, ग्वालियर, रायपूर, अलाहाबाद आणि कोटा या केंद्रांवर ६ जून २०१३ रोजी घेतली जाईल.
प्रवेश परीक्षा :
* मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन * मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ई-कॉमर्स * मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन फॉरेन ट्रेड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या पेपरमध्ये प्रत्येकी एक गुणांचे ७५ प्रश्न विचारले जातील. यामध्ये क्वॉन्टिटेटिव्ह अॅबिलिटी, डाटा इन्टरप्रिटेशन, लॉजिकल रिझिनग अॅण्ड जनरल इन्टेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस अॅण्ड अवेअरनेस अबाऊड सोशिओ- इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट या विषयांवर प्रत्येकी १५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटीच्या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांवर प्रश्न विचारले जातील. या विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचे शुल्क वर्षांकाठी १५ हजार रुपये आहे.
अर्ज प्रक्रिया- या परीक्षेसाठी www.mponline.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. अर्जाची फी १०५० रुपये. ही ऑनलाइन भरता येते. सीईटी संपर्क- ०७५५- ४०१९४०१. पत्ता- रजिस्ट्रार, देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदौर-४५२००१ दूरध्वनी- ०७३१- २५२७५३२. फॅक्स- २५२९५४०. वेबसाइट- www.dauniv.ac.in ईमेल-cet13.davv@gmail.com (पूर्वार्ध)
उद्योगसमूहांचे एकात्मिक एमबीए अभ्यसक्रम
देशातील काही उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग क्षेत्राला आवश्यक ठरणारे तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अशा काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
First published on: 24-05-2013 at 05:12 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba course for integrated industry groups