देशातील उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांचा मिलाफ साधणाऱ्या आणखी काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती- देशातील उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांचा मिलाफ साधणाऱ्या आणखी काही एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती-
द गांधीग्राम रुरल इन्स्टिटय़ूट :
द गांधीग्राम रुरल इन्स्टिटय़ूटही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने संपूर्ण अर्थसाहाय्य पुरवलेली महत्त्वाची संस्था होय. या संस्थेने मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षे कालावधीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्यानुसार प्रवेश दिला जातो.
याच संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन रुरल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. अर्ज व माहितीपत्रकाची किंमत- २५० रुपये. पत्ता- डेप्युटी रजिस्ट्रार- अकॅडमिक, द गांधीग्राम रुरल इन्स्टिटय़ूट, गांधीग्राम- ६२४३०२, दिंडिगूल. तामिळनाडू. दूरध्वनी- ०४५१-२४५२३७१, फॅक्स- २४५४४६६ वेबसाइट- http://www.ruraluniv.ac.in ई-मेल- academic@ruraluniv.ac.in
  जयपूर नॅशनल युनिव्हर्सीटि :
या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बी टेक अ‍ॅण्ड एमबीए डय़ूएल डिग्री), बॅचलर ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बी फार्म अ‍ॅण्ड एमबीए डय़ुएल डिग्री) हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पत्ता- जगतपुरा, जयपुरा- ३०२०७१, दूरध्वनी-०१४१-२७५४३९९ वेबसाइट- http://www.jnujaipur.ac.in ई-मेल- info@jnujaipur.ac.in
  गाल्गाटिएॅस युनिव्हर्सीटि :
नॉयडास्थित या संस्थेने सुरू केलेले एकात्मिक अभ्यासक्रम-
* बॅचरल ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन.
* बॅचलर ऑफ टेक्नालॉजी अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी पाच र्वष.
पत्ता- प्लॉट नंबर- २, सेक्टर १७- ए, यमुना एक्स्प्रेस वे ग्रेटर नॉयडा, गौतमबुद्धनगर (उत्तर प्रदेश), ई-मेलंadmissions@ galgotiasuniversity.edu.in वेबसाइट- http://www.galgotiasuniversity.edu.in दूरध्वनी- ०१२०-४३७००००
  जे के लक्ष्मीपती युनिव्हर्सीटि :
जयपूरस्थित या युनिव्हर्सीटिने बारावीनंतरचे पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (डय़ुएल डिग्री) (कालावधी पाच वष्रे)
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ बिझनेस
अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- (कालावधी पाच वष्रे) या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे फीमध्ये सवलत देण्यात येते. यासाठी बारावीत मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो.
१) ८१ टक्के आणि त्यापेक्षा अधिक- ७५ टक्के
२) ७१ टक्के ते ८० टक्के- ५० टक्के
३) ६१ टक्के ते ७० टक्के- ३५ टक्के
४) ५० टक्के ते ६० टक्के- २५ टक्के
पत्ता- जे. के. लक्ष्मीपती युनिव्हर्सीटि, ललिया का वास, पोस्ट ऑफिस महापुरा, अजमेर रोड जयपूर- ३०२०२६. दूरध्वनी- ०१४१-२१६८ २२५
ई-मेल- admissions.im@jklu.edu.in, वेबसाइट- http://www.jklu.edu.in
  जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटि :
संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, (बी.टेक्- एमबीए)
* बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन – मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, (बीबीए-एमबीए)
* बॅचलर ऑफ फॉर्मसी- मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बी फार्म-एमबीए)
अर्हता- बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
पत्ता- अ‍ॅडमिशन ऑफिस, ए-३०१, अंचल कॉम्प्लेक्स, रेसिडेन्सी रोड, जोधपूर-३४२००१, दूरध्वनी-०२९१-२६२३५५० ई-मेल- info@jodhpurnationaluniversity.com वेबसाइट- http://www.jodhpurnationaluniversity.com
  मेवार युनिव्हर्सिटी :
या संस्थेने सुरू केलेले अभ्यासक्रम- बॅचरल ऑफ टेक्नालॉजी – मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीटेकए मबीए डय़ुअल डिग्री क्रेडिट बेस्ड इण्टिग्रेटेड प्रोग्रॅम). या अभ्यासक्रमांतर्गत सिव्हिल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ऑटोमाबाइल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता : बारावी विज्ञान शाखेतील फिजिक्स, केमिस्ट्री  आणि मॅथेमॅटिक्स या विषयात किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांना JEE-MAIN 2013 या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी पाच वर्षांचा आहे.
अर्हता : बारावी विज्ञान शाखेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवे. BBA-MBA कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेश परीक्षा : या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ८ जून २०१३ रोजी MUEE 2013 ही प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेचा पेपर ९० गुणांचा राहील. यामध्ये लॉजिकल रिझिनग अ‍ॅण्ड न्यूमरिकल अ‍ॅबिलटी, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयांचे प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपरचा कालावधी दोन तासांचा राहील. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ८ जून २०१३ रोजी MUEE 2013 ही प्रवेशपरीक्षा घेण्यात येईल. प्रवेश परीक्षेचा पेपर ९० गुणांचा राहील. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपरचा कालावधी दोन तासांचा राहील.
परीक्षेची केंद्रे- मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक.
पत्ता- मेवार युनिव्हर्सिटि, एनएच ७९, गनग्रार, चित्तोरगढ, राजस्थान ३१२९०१, दूरध्वनी-०१४७१-२२०८८१ फॅक्स२२०८८६.
वेबसाइट- http://www.mewaruniversity.org ई-मेल- info@ mewaruniversity.org, admissions@mewaruniversity.org  (उत्तरार्ध)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा