इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या व्यवस्थापन शिक्षणातील देशातील अग्रगण्य केंद्रीय संस्थेतील प्रवेश निश्चित करणाऱ्या केंद्रीय सामाईक प्रवेश (कॅट) परीक्षेत चांगले यश मिळवणे, हे प्रत्येक परीक्षार्थीचे ध्येय असते. मात्र, त्यासाठी अभ्यासाबरोबरच तणाव व दडपण यांचा सामना करण्यासाठी आवश्यक मानसिक तयारीही लागते. या मानसिक तयारीच्या जोरावरच पंजाबमधील जसकरण सिंगने १०० पर्सेटाईल मिळवले.
पंजाबचा जसकरण सिंग सचदेव हा भोपाळच्या एनआयटीचा विद्यार्थी आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या जसकरणचा हा चौथा प्रयत्न आहे. २००९ साली पहिल्या प्रयत्नात ८८ पर्सेटाईलवर असलेल्या जसकरणचे गुण ९५, ९६ या अशा क्रमाने १०० पर्सेटाईलपर्यंत पोहोचले आहेत.
पहिल्या दोन  वेळेस आपण फारसे गंभीर नव्हतो. पण, २०११साली मी जोरदार प्रयत्न केले. पण, मला मनासारखे गुण मिळाले नाहीत. या वेळेस मी अभ्यासाबरोबरच परीक्षेच्या ताणाला आणि दडपणाला सामोरे जाण्यासाठी खूप मानसिक तयारी केली होती. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून करिअरमध्ये फारच मर्यादा येतात. म्हणून मी आयआयएमचे प्रयत्न सोडले नाहीत, असे जसकरण सांगतो.
जसकरणप्रमाणे ३२ वर्षांच्या बी. राजेश या कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या विद्यार्थ्यांनेही १०० पर्सेटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. राजेशची ही दुसरी खेप आहे. गेल्या खेपेसही त्याला १०० पर्सेटाईलची कमाई केली होती. आयआयएम-बंगलोरमध्ये त्याला प्रवेशही मिळाला होता. २००३ साली त्याने या संस्थेतून व्यवस्थापनाची पदवी मिळविली. त्यानंतर तो लंडनमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाला. तीन वर्षांपूर्वी भारतात परत येऊन त्याने कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपला जुना अध्यापनाचा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. कॅट परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी त्याने ही परीक्षा दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा