आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या राज्यातील प्राध्यापकांच्या सर्वात मोठय़ा संघटनेतर्फे आझाद मैदानात सोमवारी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.नेट, सेट न दिलेल्या प्राध्यापकांना मान्यता देण्यात यावी, याबाबत ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च आदेश आहेत. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या शिवाय परीक्षेच्या कामात सहकार्य न केल्याबद्दल रोखण्यात आलेले एप्रिल-मार्च, २०१३ या दोन महिन्याचे वेतन देण्यात यावे. समाजशास्त्र आणि आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची ग्रॅच्युईटी, वेतन श्रेणी आणि निवृत्ती वेतनविषयक प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या. अर्धवेळ प्राध्यापकांच्या नियुक्ती, वेतन थकबाकीचा प्रश्न सोडविण्यात यावा, या चार प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन होईल.

Story img Loader