आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टची धूम अद्याप सरली नसून त्यातील व्याख्यानांच्या मालिकेत अमेरिकेतील राजकीय विश्लेषक आणि हारवर्ड विद्यापीठातील प्राध्यापक मायकेल सेंडल यांचे व्याखान बुधवार २२ जानेवारी रोजी होणार आहे. प्राध्यापक सेंडल यांनी आजपर्यंत १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांचे हे कार्य हारवर्डच्या इतिहासात नोंदविले गेले आहे. सेंडल यांचा न्यायव्यवस्थेवरही गाढा अभ्यास असून ते आयआयटीमध्ये ‘जस्टिस – व्हॉट द राइट थिंग टू डू’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अमेरिकेतील राजकारण, बँक बेलआऊट्स, सामाजिक विषमता, समलिंगी विवाह आदी मुद्यांवर ते बोलणार आहेत.
हे व्याख्यान सर्वासाठी खुले असून प्रवेशासाठी http://www.techfest.org/Michael/gate-pass.pdf  या संकेतस्थळावर भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे, असे आयआयटीने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा