यूपीएससी परीक्षेच्या मुद्दय़ावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अध्यक्षा अमित शाह आणि इतर नेत्यांबरोबर रविवारी स्वतंत्ररीत्या चर्चा केली.
यूपीएससी परीक्षेचा वाद मिटविण्यासाठी गुजरात भवना झालेल्या बैठकीत जे.पी. नंदा आणि राम माधव उपस्थित होते. सायंकाळी सिंह यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्याशी चर्चा केली, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार वर्मा समितीच्या अहवालावर अभ्यास करीत आहे. सध्या अस्तित्वातील यूपीएससी परीक्षेच्या आराखडय़ात संभाव्य बदलांविषयी वर्मा समितीने आपला अहवाल सादर केला आहे. सर्व मुद्दय़ांचा अभ्यास करून त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

Story img Loader