मित्रांनो, गेल्या रविवारच्या लेखात आपण एका पर्यायावरून अनेक प्रश्न कसे तयार करता येतात, याबद्दलची माहिती घेतली. आज आपण अभ्यासक्रमातील विषयांची तयारी करताना आपला दृष्टिकोन कसा असावा, याबाबत चर्चा करणार आहोत.
उदा. इतिहास या घटकातील ‘स्वातंत्र्य चळवळीचे अखेरचे पर्व (१९३९-१९४७)’ या मुद्दय़ाची चर्चा करूया. १९३९ ते ४७ या काळातील घटनांचा क्रमवार अभ्यास करणे आवश्यक ठरते.
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्याची मुख्य कारणे-=भारतीय नेत्यांची, पक्षांची या युद्धाबाबतची भूमिका.
= ब्रिटिशांनी या युद्धात भारतीयांचे सहकार्य मिळावे, म्हणून केलेले विविध प्रयत्न.
योजना : वेव्हेल योजना, सिमला परिषद, राजाजी योजना, देसाई लियाकत योजना, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, माऊंट बॅटऩ
= काँग्रेस, लीग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कम्युनिस्ट पक्ष, विद्यार्थी चळवळ, स्त्रियांचा सहभाग, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष, संस्थानिक, कामगार चळवळी यांची भूमिका. = विविध महत्त्वाच्या नेत्यांचे उद्गार = आंतरराष्ट्रीय परिस्थिती = १९४२ चे छोडो भारत आंदोलन = नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रयत्ऩ = नौदलाचे बंड, भूमिगत आंदोलने, प्रति सरकार इ. वरील
सर्व मुद्दय़ांचा पाश्र्वभूमी- कारणे- परिणाम या त्रिसूत्रीच्या साहाय्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. या त्रिसूत्रीचा वापर अभ्यासक्रमातील सर्व घटकांची तयारी करताना करणे उपयोगी ठरू शकते.
आयोगाने बदललेला अभ्यासक्रम व त्यांचे गुण जाहीर केले असले तरी प्रश्नांची संख्या जाहीर केलेली नाही. संघ लोकसेवा आयोगाचा प्रभाव लक्षात घेता सामान्य अध्ययन-१ या प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न (प्रत्येकी २ गुण) असेही असू शकतात किंवा २०० प्रश्नही असू शकतात. दोन तासांत हे प्रश्न सोडविताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नक्कीच बदलले असेल. त्या अनुषंगाने आपण गेल्या आठवडय़ात प्रश्नमालिका सादर केलेल्या आहेत.
मित्रांनो पारंपरिक पद्धतीचे प्रश्न हे एका ओळीचे असतात, तसेच पर्यायही एका शब्दाचे असत. याला काही अपवाद असतात. बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका या घोकंपट्टी वा ठोकळेबद्ध पद्धतीला अनुकूल नसतील. एखाद्या विशिष्ट विषयाला झुकते माप देणाऱ्या नसतील अशी अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वर चर्चिलेल्या ‘संकल्पनांचे आकलन- पाश्र्वभूमी- कारणे- परिणाम’ या चतु:सूत्रीचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही.
विषय – भारताचा आर्थिक व सामाजिक विकास
प्र.  १७  (४) अ ब ड, प्र. १८  (अ), प्र. १९  (अ), प्र.  २० (अ)   
विषय-भूगोल-भारत-महाराष्ट्र-जग
प्र. २१.(अ), प्र. २२  (ब), प्र. २३  (अ), प्र. २४  ४ राईन – बर्लिन, प्र. २५  ४ व्हॅनझुएला-पंपास
विषय – पर्यावरण
प्र. २६  ४     वन्यजीव सुरक्षा कायदा – १९८६, प्र. २७ (क),     प्र. २८  (अ), प्र. २९  (क), प्र. ३०  (अ)
विषय – सामान्यविज्ञान
प्र. ३१ (२) अ, ब, ड, प्र. ३२ (क), प्ऱ ३३ (क),
प्र. ३४. (ड), प्र. ३५. (क), प्र. ३६ (३) ब, क, ड,
प्र. ३७. (ब), प्र. ३८. ४, प्र.  ३९. (क), प्र. ४०. (ड),
प्र. ४१. (ड), प्र. ४२  (३) ४ ३ १ २, प्र.  ४३ (ब),
प्र. ४४  (ड), प्र.  ४५. (क), प्र. ४६ (ब), प्र. ४७. (३),
प्र. ४८ (४), प्र.  ४९ (अ) प्र. ५०. (ड) प्र.  ५१  (ब)
प्र. ५२. (अ), प्र. ५३ (ब) प्ऱ ५४  (४) ड
विषय – भूगोल
प्र. ५५. (क), प्र ५६. (ड), प्र ५७  (१) अ, ब, क
प्र. ५८. (ड) प्र.  ५९ (अ), प्र.  ६०  ४ (ड) प्ऱ  ६१  (४) अ, ब, क, ड. प्ऱ  ६२ (१) प्र. ६३. (४) प्र  ६४  (४) विधान ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर प्र  ६५ (४), प्र  ६६. (ड),
प्र. ६७. (क), प्र. ६८.   (ड), प्र. ६९  (अ), प्र. ७०  (४) प्र. ७१.  (अ),  प्र  ७२. (अ)                                

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा