आयोगाने अभ्यासक्रमात दुसऱ्या क्रमावर ‘इतिहास’ या घटकाचा उल्लेख केला आहे. या घटकात भारताचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाचा समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय मागील अभ्यासक्रमातील भारतीय स्वातंत्र्यता चळवळ या घटकालाही स्थान दिले आहे. या घटकाची तयारी करताना संदर्भसाहित्याचे वाचन करणे गरजेचे ठरते. कारण महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. य. दि. फडके लिखित ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या पुस्तकाचे खंड या दृष्टीने उपयोगी ठरतील. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ, हिंदू महासभा, सत्यशोधक समाज, कामगार आंदोलने, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, शेतकरी चळवळ, दलित मुक्तीचा लढा, महाराष्ट्रात गाजलेले वाद उदा. खान-पाणिंदीकर विवाह, पंचहौद मिशन यांची चर्चा केलेली दिसत नाही. त्यामुळे संदर्भग्रंथ महत्त्वाचे ठरतात.
या घटकांचा अभ्यास करताना संकल्पना व पाश्र्वभूमी व परिणाम यांचा विचार करणे गरजेचे ठरते. उदा. १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याला २०१२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत या संबंधी प्रश्नांची तयारी करताना १९३५ च्या कायद्यासंदर्भात त्या काळातील विविध राजकीय पक्षांची भूमिका, त्या कायद्यातील तरतुदी, त्या वेळेचे व्हाइसरॉय, ब्रिटनचे पंतप्रधान, भारतमंत्री, काँग्रेसचे अध्यक्ष, या कायद्यानुसार किती प्रांतांत निवडणुका झाल्या व कोणाची सरकारे स्थापन झाली? या कायद्याचे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने महत्त्व या सर्व बाबींचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. यासाठी संदर्भपुस्तके महत्त्वाची ठरतात. ग्रंथालयात जाऊन महत्त्वाच्या ग्रंथांचा/ पुस्तकांचा परीक्षेच्या दृष्टीने वापर करणे योग्य ठरेल.
आयोगाने नव्या अभ्यासक्रमात भूगोल या घटकाला तिसरे स्थान दिले आहे. या घटकात भारताचा, जगाचा व महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा समावेश आहे. प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे. या घटकाची तयारी करताना तुलनात्मक (comparative) पद्धतीने अभ्यास करणे योग्य ठरेल. नकाशांचे सूक्ष्म वाचन व अभ्यास हा भाग महत्त्वाचा ठरतो. संकल्पनांचे स्पष्ट आकलन होणे गरजेचे ठरते. उदा. एखाद्या नकाशातील विशिष्ट स्थळांची पर्यायातील उत्तरांशी सांगड घालणे. यामध्ये औद्येगिक ठिकाणे, उत्पादने, नद्या, नैसर्गिक संसाधने, पिके, जमीन, मृदा, हवामान प्रकार, वने इत्यादी घटकांचा समावेश होतो. या घटकांची तयारी करताना शालेय पुस्तके महत्त्वाची ठरतात. तसेच जगाच्या, भारताच्या व महाराष्ट्राच्या नकाशाचे वाचनही आवश्यक ठरते. प्रा. सवदी यांची या विषयावरील पुस्तके उपयुक्त ठरतात. याशिवाय ‘एनसीइआरटी’ची पुस्तकेही पूरक आहेत.
नव्या अभ्यासक्रमात चौथा घटक म्हणून महाराष्ट्र व भारताच्या संदर्भात राज्यव्यवस्था व शासन पद्धती या घटकाचा उल्लेख आहे. यामध्ये राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतराज, नागरी प्रशासन, नागरिकांचे हक्क या उपघटकांचा समावेश आहे. या घटकांची तयारी करताना गेल्या एक ते दीड वर्षांत घडलेल्या घडामोडींचा संबंध राज्यघटनेशी व राज्यव्यवस्थेशी लावणे क्रमप्राप्त ठरते. उदा. लोकपाल बिल, महिला आरक्षण, राइट टू रिकॉल, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार, संसद सार्वभौम की जनता सार्वभौम हा चर्चित असलेला वाद, आदिवासी महिला, मागास समूहांचे हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य (शाहीन प्रकरण), आंतरराज्यवाद, आसाम प्रश्न या चर्चित विषयांचा घटनेच्या अंगाने अभ्यास करणे गरजेचे ठरते. या घटकांची तयारी करताना एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी, तुकाराम जाधव यांची राज्यघटनेवरील पुस्तके ही महत्त्वाची संदर्भसाहित्ये ठरतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे वर्तमानातील घटनांची या अभ्यासक्रमाशी सांगड घालणे गरजेचे ठरते.
आयोगाने आर्थिक व सामाजिक विकास या घटकाला पाचवे स्थान दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा