एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : पेपर 2 घडय़ाळासंदर्भातील प्रश्न
पेपर 2 मध्ये घडय़ाळावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. हे प्रश्न वेगात सोडविण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करावा.
1. घडय़ाळ हे वर्तुळाकृती असते त्यामुळे घडय़ाळात एकूण 360' असतात. त्याचे 12 भाग म्हणजे प्रत्येक 2 अंकात 30' असतात.
2. घडय़ाळाचे दोन्ही काटे दर तासाला एकावेळी एकावर एक येतात. तर दर 12 तासांनी ती 11 वेळा एकावर एक येतात. (12 वाजेची स्थिती वगळून)
3. घडय़ाळाच्या दोन्ही काटय़ांत 90' कोन दर तासाला दोन वेळा होतो. तर दर बारा तासांत 90' कोन 22 वेळा होतो. (3 वाजेची व 9 वाजेची स्थिती वगळता)
4. घडय़ाळाच्या दोन्ही काटय़ांत 180' कोन दर तासाला एक वेळा होतो तर दर 12 तासांत 180' कोन 11 वेळा होतो. (6 वाजेची स्थिती वगळून)
5. घडय़ाळाच्या दोन काटय़ांतील कोन काढण्यासाठी खालील सूत्र वापरावे.