प्र. 27. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान 37 अंश इतके असते.
ब) गोवर हा जिवाणूजन्य आजार आहे.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* गोवर हा विषाणूजन्य आजार आहे.
प्र. 28. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत अ जीवनसत्त्वाचा नाश होतो.
ब) कागद उद्योगात कागदाला चमक आणण्यासाठी नीळ याचा वापर केला जातो.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ब जीवनसत्त्वाचा नाश होतो.
* कागद उद्योगात कागदाला चमक आणण्यासाठी तुरटी याचा वापर केला जातो.
प्र. 29. खालीलपकी कोणती जोडी चुकीची आहे?
पर्याय : 1) भारतीय कृषी संशोधन संस्था – दिल्ली
2) भारतीय पशु विज्ञान संशोधन संस्था-इज्जतनगर (यू.पी.)
3) राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संस्था – कर्नाल ( हरियाणा)
4) केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था – गोवा
* केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था – मुंबई
प्र. 30. सदुर संवेदन (कफर) उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात?
पर्याय : 1) अंडाकृती व विषुववृत्तीय
2) वर्तृळाकार व ध्रुवीय
3) अंडाकृती व ध्रुवीय
4) वर्तृळाकार व विषुववृत्तीय
प्र. 31. बीटी वांग्यास देशामध्ये लोकांकडून विरोध होण्याची खालीलपकी कारणे कोणती?
अ) मृदेतील बुरशीपासून अलग केलेले जनुक वांग्याच्या जनुकीय पदार्थामध्ये टाकून बीटी वांगे बनवितात.
ब) बीटी वांग्यांचे बियाणे टर्मिनेटर बियाणे असून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना बियाणे उत्पादकांकडून नवीन बियाणे खरेदी करावे लागते.
क) बीटी वांग्यांचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती लोकांमध्ये आहे.
ड) बीटी वांग्यांचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
योग्य पर्याय निवडा.
पर्याय : अ) अ,ब आणि क ब) ब आणि क
क) क आणि ड ड) वरील पकी सर्व
प्र. 32. कार्बन क्रेडीट ही संकल्पना कोठे उदयास आली?
पर्याय : अ) वसुंधरा परिषद, रिओ-दि-जनेरो
ब) क्योटो प्रोटोकॉल
क) माँट्रियल प्रोटोकॉल
ड) जी – 8 परिषद, न्यूयॉक.
प्र. 33. ‘रेड डाटा बुक’मधील गुलाबी पृष्ठे काय दर्शवितात?
पर्याय : अ) धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातींची यादी
ब) धोक्याबाहेर पडलेल्या वन्य प्रजातींची यादी
क) नामशेष किंवा विलोप पावलेल्या वन्य प्रजातींची यादी
ड) स्थानविशिष्ट (Endemic) असणाऱ्या वन्य प्रजातींची यादी.
प्रश्नांची उत्तरे : प्र. २७- १, प्र. २८- ३, प्र. २९- ४.
प्र. ३०- २. प्र. ३१- क, प्र. ३२- अ, प्र. ३३- अ.
क्रमश:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा