विषय : चालू घडामोडी
प्र. ८२.    भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय :    अ)    स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वात अधिक १९६१-७१ च्या दशकात होता.
    ब)    स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी १९११-२१ या दशकात होता.
    क)    २००१-११ या दशकात सर्वाधिक साक्षरता वाढीचा दर बिहार राज्याचा आहे.
    ड)    २००१च्या तुलनेत भारतातील ०.६ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये मुलींचे प्रमाण २०११ मध्ये वाढले.
प्र. ८३.    ‘कृष्णा नदी जलवाटप आयोग’ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
पर्याय :    अ)    १० डिसेंबर २०१० रोजी दुसऱ्या लवादाने निर्णय जाहीर केला.
    ब)    अलमट्टी धरणाची उंची ५१९ मी. वरून ५२४.२ मी. वाढविण्यास लवादाने परवानगी दिली.
    क)    दुसऱ्या लवादाचा निर्णय ३१ मे २०५०पर्यंत बंधनकारक राहणार आहे.
    ड)    दुसऱ्या लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रास ९११ ळटउ पाणी उपलब्ध होणार आहे.
प्र. ८४.    कसोटी क्रिकेटमधील २००० वा सामना कोणत्या संघात झाला?
पर्याय :    अ) भारत- ऑस्ट्रेलिया    ब) भारत- न्यूझीलंड
    क) भारत- बांगलादेश    ड) भारत- इंग्लंड
प्र. ८५.    भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये ‘एस बॅण्ड’ संबंधात झालेल्या भ्रष्टाचारात गुंतलेली ‘देवास’ ही कंपनी कोणत्या देशातील आहे?
पर्याय :    अ) भारत    ब) स्वित्झरलँड
    क) फ्रान्स    ड) साऊथ कोरिया.
सामान्य अध्ययन- २
उताऱ्याचे आकलन
उतारा १- उतारा वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
ग्रामीण वास्तव, ग्रामीण संस्कृती व ग्रामीण बोली यांचा वापर करणारे साहित्य, खेडी व त्यांचा परिसर व त्यात वावरणारी माणसे, त्यांचे जीवन हे ग्रामीण साहित्याचे कथन केंद्र असते. खेडय़ातील माणसांच्या जीवनरीती श्रद्धाविश्वे. शेती व निसर्ग यांच्याशी असणारे भावबंध, ग्रामव्यवस्थेतील बलुतेदारी, सामाजिक, आर्थिक संबंधांची पारंपरिक व्यवस्था, आधुनिक काळात आलेली पंचायत राज व्यवस्था, सहकार तत्त्वावर चालणाऱ्या विविध संस्था, यंत्र संस्कृतीचे ग्रामीण जीवनावर झालेले आक्रमण व त्याचे परिणाम, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने बदलत चाललेले ग्रामीण जीवन, तेथील व्यक्ती व समूह यातील ताण ही ग्रामीण साहित्याची आशयसूत्रे असतात. निसर्ग हा ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू असल्यामुळे ग्रामीण साहित्यातून निसर्गकेंद्री जीवनरीतींचे जीवनदर्शन घडणे स्वाभाविक मानले गेले. परंतु बदलत्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थांच्या रेटय़ांमुळे या निसर्गकेंद्रित जीवनपद्धतीत मूलगामी स्थित्यंतर घडून येत आहे. त्याचे दर्शन घडवणे हे ग्रामीण साहित्याने अलीकडच्या काळात स्वीकारलेले आव्हान आहे.
ग्रामीण साहित्यामागच्या प्रेरणा महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारात आहेत. १९२० नंतर गांधीवादाच्या प्रभावाने ‘ग्रामोद्धार’ या कल्पनेला महत्त्व येऊन ग्रामोद्धाराचे चित्रण साहित्यात व्हावे, अशी अपेक्षा निर्माण झाली. परंतु, या काळात स्वप्नरंजनाचा प्रभाव असल्याने सामाजिक स्थित्यंतराशी संवाद साधणारे वास्तव ग्रामीण साहित्यात फारसे निर्माण झाले नाही. १९४५ नंतर वास्तववादाच्या प्रभावामुळे खेडय़ाच्या बदलत्या रूपाचा व खेडय़ातील वास्तव जीवनाचा वेध घेणारे साहित्य लिहिले जाऊ लागले.
प्र. १.    ग्रामीण साहित्याची आशयसूत्रे म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येणार नाही?
पर्याय : अ) खेडय़ातील माणसांची श्रद्धाविश्वे
    ब) सामान्य व्यवस्थेतील बलुतेदारी
    क) खेडय़ात वावरणारी माणसे
    ड) यंत्र संस्कृतीचे ग्रामीण जीवनावर झालेले आक्रमण
प्र. २. उताऱ्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)    १९२० नंतर सामाजिक स्थित्यंतराशी संवाद साधणारे वास्तव ग्रामीण साहित्यात निर्माण झाले.
ब)    १९२० नंतरच्या ग्रामीण साहित्यावर स्वप्नरंजनाचा प्रभाव होता.
क)    ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून निसर्गाचा उल्लेख केलेला आहे.
ड)    ग्रामीण वास्तव, ग्रामीण संस्कृती व ग्रामीण जातिव्यवस्था यांचा वापर करणारे साहित्य म्हणजेच ग्रामीण साहित्य होय.
पर्याय : १) अ, ड २) अ, ब ३) फक्त ‘अ’ ४) अ, ब, ड
प्र. ३.    अलीकडच्या काळात ग्रामीण साहित्याने कोणते आव्हान स्वीकारले आहे?
पर्याय :    अ)    ग्रामीण साहित्यातून निसर्गकेंद्री जीवनरीतीचे दर्शन घडविणे.
    ब)    सामाजिक स्थित्यंतराशी संवाद साधणारे ग्रामीण साहित्य निर्माण करणे.
    क)    खेडय़ातील वास्तव जीवनाचा वेध घेणारे साहित्य लिहिणे.
    ड)    बदलत्या राजकीय, आर्थिक, सामाजिक रेटय़ामुळे निसर्गकेंद्री ग्रामीण जीवनपद्धतीत घडून येणाऱ्या मूलगामी स्थित्यंतराने दर्शन घडविणे.
प्र. ४.    ग्रामीण साहित्यातून कशा प्रकारच्या जीवनरीतींचे दर्शन घडणे स्वाभाविक मानले गेले?
पर्याय :    अ)    ग्रामव्यवस्थेतील बलुतेदारीचे
    ब)    यंत्रसंस्कृतीचे ग्रामीण जीवनावर झालेल्या परिणामांचे
    क)    आधुनिक काळातील पंचायत राज व्यवस्था व सहकाराचे.
    ड)    निसर्गकेंद्री जीवनरीतीचे
प्र. ५.    उताऱ्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे?
पर्याय :    अ)    १९२० नंतरच्या ग्रामीण साहित्यावर वास्तववादाचा प्रभाव होता.
    ब)    १९२० नंतरच्या साहित्यात गांधीवादाच्या ग्रामोद्धाराचा प्रभाव दिसतो.
    क)    १९४५ नंतर वास्तववादी ग्रामीण साहित्य लिहिले जाऊ लागले.
    ड)    आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने ग्रामीण जीवनात कोणताही बदल घडून आला नाही.
(क्रमश:)

Story img Loader