प्र. ३१. खालीलपैकी अचूक विधान/विधाने ओळखा-
(अ) समस्थानिकांचे ((Isotopes) अणुअंक समान असतात, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात़
(ब) समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात़
(क) समस्थानिकांचे भौतिक गुणधर्म सारखे असतात़
(ड) किरणोत्सारी समस्थानिकांची केंद्रके अस्थिर असतात़
पर्याय-(१)अ,ब,क (२) अ,ब,ड, (३) ब,क,ड (४) अ,क,ड
प्र.३२. चुकीचे विधान ओळखा-
(अ) सहसंयुज संयुगे विजेची कमी प्रमाणात वाहक असतात़
(ब) सहसंयुज संयुगे ही सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतात़
(क) सहसंयुज संयुगांचा उत्कलनांक व द्रावणांक जास्त असतो़.
(ड) मिथेन हे सहसंयुज संयुग आह़े
प्र. ३३ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
पाशी पोटी माणसाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण प्रति १०० मि़लि़ ला सामान्यत: …… असावे असे वैद्यकीयदृष्टय़ा प्रमाण मानले जात़े
पर्याय-
(अ) ३०-५० मिलिग्रॅम
(ब) ५०-७० मिलिग्रॅम
(क) ८०- १०० मिलिग्रॅम
(ड) १२०-१४० मिलिग्रॅम
प्र. ३४ ‘बायोप्सी’ या तंत्राबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
(अ) मृत्यूचे निदान करण्यासाठी मृतदेहाचे परीक्षण करण़े
(ब) पर्यावरणातील जैविक घटनांचा अभ्यास करण़े
(क) कृत्रिम पर्यावरणात जैविक घटकांचा अभ्यास करण़े
(ड) पेशी व ऊतींचा वापर वैद्यकीय निदान करण्यासाठीचे तंत्र होय़
प्र. ३५. दूध घुसळून लोणी तयार करण्याच्या क्रियेत कोणते बल कार्यरत असते?
(अ) गुरुत्वाकर्षण बल
(ब ) घर्षणजन्य बल
(क) केंद्रोत्सारी बल
(ड) केशाकर्षण बल
प्र. ३६ खालील पैकी कोणते तरंग निर्वात पोकळीतून प्रसारित होऊ शकतात?
(अ) रेडिओ तरंग
(ब) प्रकाश तरंग
(क) क्ष- किरण
(ड) श्राव्यातीत तरंग
पर्याय (१) अ,ब,क (२) अ,ब,क,ड (३) ब,क,ड (४) अ,ड
प्र. ३७. अल्झायमर हा विकार मानवी शरीरातील कोणत्या पेशींशी संबंधित आहे?
(अ) मूत्रपिंड पेशी
(ब) चेतापेशी
(क) यकृत पेशी
(ड) यापैकी नाही
प्र. ३८. चुकीची जोडी ओळखाशास्त्र
विषय
१. सायटोलॉजी पेशींची अभ्यास
२. इथोलॉजी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास
३. हिस्टोलॉजी ऊतींचा अभ्यास
४. ऑस्टीओलॉजी डोळ्यांचा अभ्यास
प्र . ३९ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा़ ………. हे मूलद्रव्य कृत्रिमरीत्या तयार केले जात़े
पर्याय-
(अ) थोरिअम
(ब) रेडियम
(क) प्लुटोनियम
(क) युरेनियम
प्र.४० रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा‘ए ण्डोस्कोपी’ हे तंत्र ………. या तत्त्वावर आधारित आह़े
पर्याय-
(अ) प्रकाशाचे परावर्तन 
(ब) प्रकाशाचे अपस्करण
(क) प्रकाशाचे अपवर्तन
(ड) प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन
(क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा