वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान
प्र. 10. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ऑप्टिकल फायबर हे विकिकरण या तत्त्वावर कार्य करते.
ब) समुद्रसपाटीपासून उंच राहणारे लोक उकळता चहा पितात, कारण वातावरणाचा दाब कमी असल्याने चहाचा उत्कलनिबदू कमी असतो.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
प्र. 11. निकट दृष्टीचा मनुष्य –
पर्याय : अ) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो.
ब) दूरच्या व जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही.
क) दूरच्या वस्तू पाहू शकतो, परंतु जवळच्या वस्तू पाहू शकत नाही.
ड) यांपकी नाही.
योग्य विधाने : ड्ट जवळच्या वस्तू पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू पाहण्यास त्यास त्रास होतो. (अधिक माहिती : दूरदृष्टीतेमध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात तर
जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. )
प्र. 12. बर्फ वितळताना खालीलपकी काय घडते?
पर्याय : अ) वितळताना त्याचे आकारमान व तापमान वाढते.
ब) वितळताना त्याचे आकारमान व तापमान कमी होते.
क) वितळताना त्याचे आकारमान कमी होते व तापमान कायम राहते.
ड) वितळताना त्याचे आकारमान कायम राहते व
तापमान कमी राहते.
प्र. 13. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा चटकन पसरण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो.
ब) फळे कापताना कापायच्या सुरीला धार लावणे आवश्यक असते, कारण सुरीवर लावलेले बळ अधिक क्षेत्रफळावर कार्य करते.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी द्रवाचा समपातळीत राहण्याचा गुणधर्म उपयोगी पडतो.
* फळे कापताना कापायच्या सुरीला धार लावणे आवश्यक असते, कारण सुरीवर लावलेले बळ कमी क्षेत्रफळावर कार्य करते. त्यामुळे अधिक दाबाची निर्मिती होते.
प्र. 14. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) कॅरम खेळण्यापूर्वी कॅरम बोर्डवर बोरिक पावडर टाकतात, कारण त्यामुळे कॅरम बोर्ड स्ट्राइकर व सोंगटय़ा यांच्या मधील घर्षण कमीतकमी राखण्यात येते.
ब) बल जेव्हा बलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते, कारण बलाकडून बलगाडीवर बल प्रयुक्त होते.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* बल जेव्हा बलगाडी ओढतो तेव्हा गाडी पुढे जाते, कारण जमिनीकडून बलांच्या पायावर बल प्रयुक्त होते.
प्र. 15. दोलकाची लांबी कमी केल्यास दोलनकाल –
पर्याय : 1) कमी होतो.
2) जास्त होतो.
3) तेवढाच राहतो.
4) दुप्पट होतो.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १०- १, प्र. ११- ड, प्र. १२- क, प्र. १३३, प्र. १४- १, प्र. १५- १.
(क्रमश:)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा