प्र. 19. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
उकळत्या पाण्याच्या चटक्यापेक्षा वाफेचा चटका तीव्र
असतो कारण –
अ) वाफेचे तापमान उकळत्या पाण्यापेक्षा जास्त असते.
ब) मध्यभागी वर्तुळाकार छिद्र असलेली धातूची वर्तुळाकार चकती तापविल्यास मधल्या छिद्राचा व्यास वाढेल.
पर्याय : 1) ब विधान बरोबर आहे.
2) अ विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* उकळत्या पाण्याच्या चटक्यापेक्षा वाफेचा चटका तीव्र असतो, कारण- वाफेचे रूपांतर द्रवात होताना अप्रकट उष्मा प्रकट
होतो.
प्र. 20. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) अणुबॉम्ब हा केंद्रीय संमीलन या अभिक्रियेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
ब) हायड्रोजन बॉम्ब हा अनियंत्रित शृंखला अभिक्रियेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* अणुबॉम्ब हा शृंखला या अभिक्रियेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
* हायड्रोजन बॉम्ब हा केंद्रीय संमीलन अभिक्रियेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
प्र. 21. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स’ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक स्टीफन हॉकिंग हे आहेत.
ब) गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू प्रमुख असतो.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 22. पदार्थ शास्त्रीयदृष्टय़ा खालीलपकी लवचिक पदार्थ कोणता?
पर्याय : 1) प्लास्टिक 2) काच
3) रबर 4) यांपकी नाही.
प्र. 23. माणसाच्या शरीरातील तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती?
पर्याय : 1) पिच्युटरी 2) थायरॉइड
3) हायपोथॅलामस 4) यांपकी नाही.
प्र. 24. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) त्रिफळाचूर्णामध्ये हिरडा, बेहडा आणि शतावरी हे असते.
ब) सफोला हे खाद्यतेल सूर्यफुलापासून तयार केले जाते.
पर्याय : 1) अ विधान बरोबर आहे.
2) ब विधान बरोबर आहे.
3) अ व ब विधान चूक आहे.
4) अ व ब विधान बरोबर आहे.
* त्रिफळाचूर्णामध्ये हिरडा, बेहडा आणि आवळा हे असते.
* सफोला हे खाद्यतेल करडईपासून तयार केले जाते.
प्र. 25. प्रकाशकिरणांच्या सप्तरंगी पट्टय़ात कोणत्या रंगाची तरंग लांबी (wave lenth) सर्वात कमी असते?
पर्याय : 1) तांबडा 2) निळा 3) हिरवा 4) जांभळा.
प्र. 26. लोण्यामध्ये पाणी व स्निग्धांश यांचे प्रमाण सामान्यत: … इतके असते?
पर्याय : 1) 11:89 2) 15:85 3) 66:34 4) 19:81
* पाणी 19% आणि स्निग्धांश 81%
प्रश्नांची उत्तरे : प्र. १९- १, प्र. २०- ३, प्र. २१- ३,
प्र. २२- १, प्र. २३- ३, प्र. २४- ३, प्र. २५- ४, प्र. २६- १.
क्रमश:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा