रखडलेले निकाल, त्यातले घोळ, उशीरा मिळणाऱ्या गुणपत्रिका आदी परीक्षाविषयक गोंधळांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदासाठी शोधाशोध सुरू झाली आहे. विद्यापीठाने या पदावर पाच वर्षांकरिता परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सध्या मुंबई विद्यापीठात कुलगुरू संजय देशमुख आणि कुलसचिव एम. ए. खान यांच्या व्यतिरिक्त प्र-कुलगुरू, बीसीयूडी संचालक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यातच परीक्षा नियंत्रकांचे महत्त्वाचे पद दिनेश भोंडे यांच्यानंतर गेली दोन महिने रिक्तच आहेत. भोंडे यांचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पदही दीपक वसावे यांच्याकडे हंगामी जबाबदारी म्हणून सोपविण्यात आले आहे. परंतु, आता या पदाकरिता पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. या पदाकरिता २३ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान परीक्षेशी संबंधित विविध अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनाकरिता परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी भरविण्याचा विचार आहे.
मुंबई विद्यापीठाची परीक्षा नियंत्रकांसाठी शोधाशोध
त्यातच परीक्षा नियंत्रकांचे महत्त्वाचे पद दिनेश भोंडे यांच्यानंतर गेली दोन महिने रिक्तच आहेत.
Written by रत्नाकर पवार
First published on: 10-10-2015 at 04:45 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mu find exam controller