रखडलेले निकाल, त्यातले घोळ, उशीरा मिळणाऱ्या गुणपत्रिका आदी परीक्षाविषयक गोंधळांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदासाठी शोधाशोध सुरू झाली आहे. विद्यापीठाने या पदावर पाच वर्षांकरिता परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सध्या मुंबई विद्यापीठात कुलगुरू संजय देशमुख आणि कुलसचिव एम. ए. खान यांच्या व्यतिरिक्त प्र-कुलगुरू, बीसीयूडी संचालक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यातच परीक्षा नियंत्रकांचे महत्त्वाचे पद दिनेश भोंडे यांच्यानंतर गेली दोन महिने रिक्तच आहेत. भोंडे यांचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पदही दीपक वसावे यांच्याकडे हंगामी जबाबदारी म्हणून सोपविण्यात आले आहे. परंतु, आता या पदाकरिता पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. या पदाकरिता २३ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान परीक्षेशी संबंधित विविध अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनाकरिता परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी भरविण्याचा विचार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा