केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व नौदल अकादमी या परीक्षा २७ सप्टेंबर रोजी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी न घेता त्या पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. २७ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गणिताची तर दुपारी २ ते ४.३० या वेळेत सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा होणार आहे. मात्र गणेश विसर्जन असल्याने या काळात परीक्षा घेऊ नये अशी मागणी आयोगाकडे करण्यासाठी उमेदवारांनी विद्यार्थी संघटनांकडे धाव घेतली आहे.
या दिवशी विसर्जन मिरवणुका असल्यामुळे उमेदवारांना परीक्षा देणे जिकिरीचे ठरणार आहे. तसेच आयोगातर्फे झालेल हा गोंधळ पहिल्यांदाच झालेला नसून अनेकवेळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावरून केंद्र आणि राज्यात संवाद नसल्याने हे प्रकार घडत असून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुधाकर तांबोळी यांनी आयोगाकडे केली आहे.